कोरोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेसाठी नियोजन हवे : उपमुख्यमंत्री अजित पवार
![Planning is needed for the third possible wave of corona: Deputy Chief Minister Ajit Pawar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/05/ajit-pawar-on-free-vaccine-in-maharashtra-cabinate-meeting.jpg)
पुणे : करोनाबाधित रुग्ण आणि प्राणवायूची वाढती मागणी लक्षात घेता प्राणवायूनिर्मिती प्रकल्प उभारणीवर भर द्यावा, अशी सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिली. आरोग्य सुविधा वाढविणे, खाटांची उपलब्धता, रेमडेसिविर इंजेक्शनची उपलब्धताही ठेवावी आणि संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी नियोजन करावे, असेही पवार यांनी स्पष्ट के ले.
विधानभवन येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली करोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठक झाली. त्यावेळी त्यांनी ही सूचना के ली. खासदार गिरीश बापट, श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, अतुल बेनके , चेतन तुपे, सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त विक्रम कु मार, पिंपरीचे आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यावेळी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की, करोना रुग्णांसाठी आवश्यक असलेला प्राणवायू पुरवठय़ामध्ये कमतरता भासणार नाही, यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. रुग्णालयात दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णाला वैद्यकीय उपचार मिळवून देण्यासाठी वैद्यकीय सुविधांमध्ये वाढ करण्याची सूचना अधिकाऱ्यांना के ली आहे. राज्य शासनाने १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद के ली आहे. मात्र लशींची उपलब्धता मर्यादित असल्यामुळे नागरिकांनी लस के ंद्रांवर गर्दी करू नये.