breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

खाकी वर्दी घालून नाचणाऱ्या पोलिसांसाठी सूचना, गणेश विसर्जन मिरवणुकीतील नाचाची महासंचालकांकडून गंभीर दखल

Notice to policemen who dance in khaki uniform, dance in Ganesh Visarjan procession taken serious note by Director General

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

यापुढे महाराष्ट्र पोलिसांनी खाकी वर्दी घालून नाचू नये, अशा स्पष्ट सूचना जारी करण्यात आल्या आहेत. गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत अनेक पोलिसांचे नाचतानाचे व्हिडीओ समोर आले होते. या व्हिडीओवरुन सोशल मीडियावर बरीच झाली. पोलिसांनी मिरवणुकीत नाचणे कितपत योग्य? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर पोलीस महासंचालकांनी या सगळ्या प्रकारणात गंभीर दखल घेत सूचना जारी केल्या आहेत.

गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये पोलिसांचा बंदोबस्त राज्यभर लावण्यात आला होता. सलग ड्युटी करुन थकलेल्या पोलिसांचा उत्साह मिरवणुकीतल्या ठेक्याने वाढवला, असा एक सूर सोशल मीडियातील चर्चेत उमटला होता. दुसरीकडे कर्तव्यावर असताना मिरवणुकीमध्ये पोलिसांनी नाचणे अयोग्य असल्याचेही काही जणांचे म्हणणे होते.

फक्त मुंबईतच नव्हे तर पुणे, कोल्हापूरमध्ये पोलिसांनी गणेश मिरवणुकीत सहभाग घेतल्याचे दिसून आले होते. इतकेच काय तर ढोल वाचवणे, वैयक्तिक पातळीवर भाषणे करणे, असे प्रकारही सोशल मीडियात व्हायरल झाले होते. त्यावरुन वादही उफाळून आला होता. यानंतर सगळ्या प्रकाराची पोलीस खात्याकडून गंभीर दखल घेण्यात आली असून राज्याच्या पोलीस महासंचालक कार्यालयतूनकडून अधिकृत पत्रक जारी करत पोलिसांना सूचना करण्यात आल्या आहेत.

दोन दिवसांपूर्वीच खाकी वर्दीत नाचू नका, अशा सूचना मुंबई पोलिसांना अतिरिक्त पोलिस महासंचालकांनीही दिल्या होत्या. गणवेशात नाचताना आढळल्यास कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. दरम्यान, आता राज्य पोलीस महासंचालक कार्यालयातूनच सर्व पोलिसांनी शिस्त पाळण्याच्या आणि कर्तव्यावर असताना गणवेशात नाचू नये, असे सांगण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button