Uncategorized

भक्ती शक्ती उद्यानातील राष्ट्रध्वजाचा होतोय अपमान

भाजपचे शहर चिटणीस सचिन काळभोर यांचा आरोप

पिंपरी : भारतातील सर्वात उंच राष्ट्रध्वज तिरंगा पिंपरी-चिंचवडमधील निगडी येथील भक्ती शक्ती उद्यान या ठिकाणी उभारण्यात आला असून, तो सध्या अनेक कारणांमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. सुमारे ४६.८५ लाख रुपयांचा वार्षिक खर्च करूनही झेंड्याच्या व्यवस्थापनाबाबत अनेक गंभीर त्रुटी असल्याचा आरोप भाजपचे शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी केला आहे.

घराघरात तिरंगा फडकवूया, देशभक्तीचा तोच अभिमान पुन्हा जागवूया हा नारा देत हर घर तिरंगा हे अभियान शासनाकडून राबविण्यात येत आहे. यामध्ये आपल्या घरासमोर तिरंग फडकवून त्यासोबत सेल्फी काढून हरघरतिरंगा डॉट कॉम या वेबसाईटवर अपलोड करून एकीकडे देशाच्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शासनाच्यावतीने करण्यात येत आहे. तर दुसरीकडे देशातील सर्वात मोठ्या निगडी भक्ती शक्ती उद्यानातील राष्ट्रध्वजाचा अवमान करण्यात येत आहे. या प्रकाराबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी तात्काळ दखल घेऊन संबंधित ठेकेदारांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे चिटणीस सचिन काळभोर यांनी केली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने हा भव्य झेंडा उभारून देशभक्तीचा गौरव केला असला, तरी प्रत्यक्षात वर्षातील केवळ आठच महिने झेंडा फडकवला जातो, तर पावसाळ्यात चार महिने तो खाली ठेवला जातो. शिवाय, १५ ऑगस्ट, २६ जानेवारी आणि १ मे या विशेष दिवसांनाच फक्त झेंडावंदन केले जाते.

हेही वाचा – ‘‘हिंजवडी आयटी पार्क ’’ समस्यामुक्त करण्यासाठी ‘‘सिंगल पॉईंट ॲथॉरिटी’’

विशेष म्हणजे, झेंड्याचे व्यवस्थापन खाजगी ठेकेदाराकडे देण्यात आले असून, दर चार-पाच दिवसांनी झेंडा फाटतो आणि त्याची विल्हेवाट लावली जाते. पण फाटलेला झेंडा तात्पुरता सिलून पुन्हा फडकावला जातो, असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अपमान होत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कामगारांकडून झेंड्याच्या देखभालीबाबत योग्य ती काळजी घेतली जात नाही, तसेच लोखंडी खांबावर चढताना सुरक्षा साधने वापरण्यात येत नाहीत, अशी माहिती समोर आली आहे. फाटलेला झेंडा उचलून कुठल्याही शासकीय देखरेखीशिवाय विल्हेवाट लावल्याचेही निदर्शनास आले आहे.

भक्ती शक्ती उद्यानातील तिरंगा पॉल संदर्भात माहिती • 107 मीटर उंच राष्ट्रध्वजाच्या व्यवस्थापनावर अनेक प्रश्नचिन्हे
पिंपरी, दि.५ (न्यूज डेस्क) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) निगडी येथील भक्ती शक्ती उद्यानात उभारलेला भारताचा सर्वात उंच राष्ट्रध्वज पॉल 2017 पासून चर्चेचा विषय ठरत आहे. तांत्रिक दृष्टिकोन, खर्च, देखभाल आणि सुरक्षेबाबत अनेक मुद्दे उपस्थित होत असतानाच, या राष्ट्रध्वजाच्या व्यवस्थापनात गंभीर त्रुटी असल्याच्या तक्रारींना वेग आला आहे.

स्थापना आणि उभारणी :
2016 मध्ये PCMC ने SS Sathe Company आणि Bajaj Electricals या कंपन्यांना 107 मीटर उंच राष्ट्रध्वज पॉल उभारण्यासाठी ठेका दिला. या प्रकल्पाच्या डिझाईनला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे (CoEP) ची मान्यता प्राप्त आहे.  ध्वजपोल 2017 मध्ये प्रत्यक्ष बसवण्यात आला. सुरुवातीस ‘भारताचा सर्वाधिक उंच ध्वजपोल’ असा महापालिकेचा दावा होता, परंतु त्यानंतर अटारी (पंजाब) आणि बेळगाव (कर्नाटक) येथे अधिक उंच ध्वजपोल उभारण्यात आले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button