Uncategorized

“सहा महिने बिळात लपून बसलेले विजय औटी यांनी आमच्या कामाबद्दल बोलू नये”; आमदार निलेश लंकेचा सणसणीत टोला

पारनेर: राज्य शासनाच्या हमीतून आणि एशियन डेव्हलपमेंटच्या बँकेच्या निधीतून धोत्रे येथे बांधण्यात येणाऱ्या सुमारे अडीच कोटी रुपये खर्चाच्या रस्त्याचे माजी मदार विजय औटी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते . औटी यावेळी म्हणाले होते की की मला असे वाटत नाही की या कामामध्ये कोणी खोडा घालावा. विकासासाठी तुम्ही निवडून आला असाल तर या गावामध्ये नको, त्या गावामध्ये रस्ता करा, या गावात मते कमी पडली त्यामुळे तेथे काम नको ही भूमिका अत्यंत चुकीची आहे. तसेच मी सर्वांचा बाप आहे अशी दर्पोवक्ती देखील त्यांनी केली होती.

 

आमदार निलेश लंके यांनी देखील विकासकामांचे उदघाटन करत त्यांचा खरपूस समाचार घेतला आहे. मी बाप नव्हे तर जनता जनार्दनाचा एक सेवक आहे. समाजकारणात आल्यापासून मी माझे जीवन जनतेसाठी अर्पण केले आहे आणि ज्यादिवशी मी स्वतःला आमदार समजू लागेल त्यादिवशी माझी जनतेसोबत असणारी नाळ तुटेल असे खणखणीत उत्तर आमदार निलेश लंके यांनी विजय औटींना दिले आहे. पंचायत समितीचे माजी सभापती राहुल झावरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील करंदी येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार लंके बोलत होते.

 

आमदार लंके म्हणाले की कोरोना महामारीच्या संकट काळात जे सहा महिने बिळात लपून बसले होते ते काय बोलतात याकडे लक्ष देण्याची मला काहीही एक गरज नाही. माझा पिंड हा पहिल्यापासूनच काम करण्याचा आहे. मी कामातच राम मानणारा माणूस आहे. कोरोना महामारीच्या दोन्ही लाटांमध्ये उभारलेल्या कोव्हिड उपचार केंद्रात तब्ब्ल १७ हजार रुग्ण कोरोनमुक्त होऊन घरी गेले आहेत. फक्त अहमदनगर जिल्हा आणि आपला मतदारसंघ सोडूनही अनेक लोक उपचार करून बरे होऊन गेले आहेत. ज्यांना स्वतःच्या माणसांचे जीव वाचवता आले नाही त्यांनी दुसऱ्यांबद्दल बोलू नये असा उपरोधिक टोला देखील लंके यांनी औटी यांना मारला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button