breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीदेश-विदेश

आपने केलेल्या आरोपांची चौकशी करा, भाजच्या 6 खासदारांचे उपराज्यपालांना पत्र

नवी दिल्ली । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

आपच्या आमदारांना 20 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली, ही ऑफर स्वीकारली नाही तर, मनीष सिसोदियांप्रमाणेच सीबीआय चौकशीला सामोरे जा, अशी धमकी भाजपाने दिल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला होता. त्यांच्या या आरोपाची चौकशी व्हावी अशी मागणी भाजपाच्या सात खासदारांनी केली आहे. दिल्लीचे उपराज्यपाल वि.के.सक्सेना यांना पत्र लिहून ही मागणी करण्यात आली आहे. खासदार हर्षवर्धन, मीनाक्षी लेखी, मनोज तिवारी, परवेश वर्मा, रमेश बिधूडी आणि हंस राज हंस यांची या पत्रावर स्वाक्षरी आहे. तर, क्रिकेटर गौतम गंभीर यांनी फोनच्या माध्यमातून या पत्राला समर्थन दिलं आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांनी केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी अशी मागणी उपराज्यपालांना दिलेल्या पत्राद्वारे करण्यात आली आहे. भाजपा आपच्या आमदारांना २० कोटींमध्ये विकत घेण्याचा प्रयत्न करतेय, असा आरोप आपने केला होता. तसंच, केजरीवाल आणि सिसोदिया यांच्यासह आपच्या इतर नेत्यांनी केलेले आरोप खोटे असल्याचं सांगत दिल्ली सरकारच्या दारू घोटाळ्यावरून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी आपने असे आरोप केले आहेत, असा दावा भाजपाच्या खासदारांनी केला आहे.

आपचा नेमका आरोप काय?
सत्ता आणि ताकदीचा वापर करून लोकशाहीचे वस्त्रहरण केले जात आहे, अशी टीका आपचे आमदार सोमनाथ भारती यांनी केली होती. भाजपा नेत्याने मलाही फोडण्याचा प्रयत्न केला. आमच्यासोबत या, नाहीतर तुमची पण हालत मनीष सिसोदिया यांच्यासारखी करू, अशी धमकी आपल्याला दिल्याचे आपचे आमदार सोमनाथ भारती यांनी सांगितले. 20 कोटी रुपये तयार आहेत आणि आणखी आमदार आणले तर 25 कोटी रुपये मिळतील, अशी ऑफर भाजपाने दिल्याचा दावा त्यांनी केला होता.

आपचे आणखी एक आमदार संजीव झा यांनी देखील आपल्याला देखील अशीच ऑफर आल्याचा दावा केला होता. आमचे ऐकले नाही तर तुमचीही सिसोदियांसारखीच गत होईल. तुम्हाला खोट्या प्रकरणांत अडकवू अशी धमकी दिली. तेव्हा मी संतप्त झालो, असे ते म्हणाले. तर, आपचे आमदार कुलदीप कुमार यांनी सांगितले की, पश्चिम दिल्लीतील भाजपाच्या बड्या नेत्याने माझ्याशी संपर्क साधला आणि दिल्लीतून आम आदमी पार्टी संपणार आहे, असे सांगितले. मलाही 20 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली. आणखी आमदार आणले तर, 25 लाख आणि तुमच्यासोबत येणाऱ्या आमदाराला 20 कोटी रुपये दिले जातील, असे प्रलोभन आपल्याला दाखवल्याचा दावा त्यांनी केला. पण आप हा लोकचळवळीतून उभा राहिलेला पक्ष आहे, त्यामुळे तुटणार नाही, असे कुलदीप कुमार म्हणाले.

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी काल रात्रीपासूनच भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. लालबागच्य राजाच्या दरबारात भाविक आणि सुरक्षारक्षकांमध्ये वाद झाला. लालबागच्या राजाच्या मुखदर्शनच्या रांगेत उभ्या असलेल्या एका महिलेमध्ये आणि काही महिला सुरक्षारक्षकांमध्ये हा वाद झाला. यावेळी गणेशाच्या दर्शनासाठी आलेल्या महिलेने महिला सुरक्षारक्षकाला धक्काबुक्की केल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर या वादात पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. या घटनेमुळे लालबागच्या राजाच्या दरबारात काही काळ तणावाचे वातावरण तयार झाल्याचे पाहायला मिळाले .

आज गणेशोत्सवाचा पहिला दिवस आणि तब्बल दोन वर्षांनी गणेशोत्सव मोठया जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लांब रांगा लागल्या आहेत. अशातच काही महिला दर्शन घेण्यासाठी अधिक काळ थांबायचा प्रयत्न करत होत्या. पण पोलिसांकडून गर्दी पाहता कोणालाच थांबू दिलं जात नाही आहे. या कारणावरुन दर्शनासाठी आलेली महिला आणि महिला सुरक्षारक्षकांमध्ये वाद झालेली आहे. यावेळी महिलेने सुरक्षारक्षक असलेल्या महिलेला धक्काबुक्की केल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांनी या वादग्रस्त परिस्थितीवर नियंत्रण मिळवून परिस्थिती पूर्ववत केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button