Uncategorizedताज्या घडामोडीदेश-विदेश

भारतीय सैन्याच्या जवानांना एक मोठी दुर्घटना टाळण्यात यश

अमरनाथवरुन पंजाबच्या होशियारपुरला जाणाऱ्या एका बसचा ब्रेक फेल

जम्मू-काश्मीर : भारतीय सैन्याच्या जवानांनी जम्मू-काश्मीर पोलिसांसोबत मिळून NH-44 वर एक मोठी दुर्घटना टाळण्यात यश मिळवलं. अमरनाथवरुन पंजाबच्या होशियारपुरला जाणाऱ्या एका बसचा ब्रेक फेल झाला होता. त्यामुळे बसने नियंत्रण गमावलं होतं. या बसमध्ये बरेच प्रवासी होते. जवानांनी हुशारी दाखवून बसला नियंत्रित केलं. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. भारतीय सैन्याच्या जवानांनी जम्मू-काश्मीर पोलिसांसोबत मिळून बसची गती कमी केली.

बसची गती कमी करण्यासाठी चाकांखाली दगड ठेऊन स्पीड नियंत्रणात आणण्याचा भरपूर प्रयत्न केला. त्यात ते यशस्वी झाले. बऱ्याच प्रयत्नानंतर अखेर बसला नियंत्रित करण्यात यश मिळवलं. बसला नाल्यात कोसळण्यापासून वाचवलं. या बसमध्ये 40 प्रवासी होते. ब्रेक फेल झाल्याच समजल्यानंतर बसमधील प्रवासी पार हादरुन गेले होते. अनेक लोक बसमध्ये जागेवरुन उठले व पळापळ सुरु केली. यात काही लोक जखमी झाले. जखमींमध्ये सहा पुरुष, तीन महिला आणि एक लहान मुलगा आहे.

सैन्याची क्विक रिएक्शन टीम लगेच पोहोचली
अधिकाऱ्यांनी सांगितलं की, बसमध्ये 40 यात्रेकरु होते. पंजाब होशियारपुरला ते चालले होते. बनिहालच्या जवळ नचलाना येथे पोहोचल्यानंतर ब्रेक फेल झाल्यामुळे ड्रायव्हर बस थांबवू शकला नाही. सैन्याची क्विक रिएक्शन टीम रुग्णवाहिकेसह घटनास्थळी पोहोचली. सर्व जखमींची मदत केली. सर्व जखमींना नचलानाच्या स्थानिक मेडीकल फॅसिलिटीमध्ये मदत देण्यात आली. काही लोक गंभीर जखमी झाले होते.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button