Uncategorized

पंकजा मुंडे आपला निर्णय जाहीर करतील, पण पंकजा मुंडे या वेगळा निर्णय घेतील असं वाटत नाही; राम शिंदे

अहमदनगर: महाराष्ट्रातील मुंडे समर्थकांत असंतोषाच्या वृत्तांनंतर भाजपाचे राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा प्रमुख जे.पी. नड्डा यांच्यासमवेत पक्ष सचिवांच्या बैठकीला रविवारी हजेरी लावली. खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही. त्यामुळे मुंडे समर्थक नाराज होणं स्वाभाविक आहे. पण पंकजा मुंडे वेगळा निर्णय घेतील असं वाटत नाही, असा विश्वास भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

 

एका न्युज चॅनेलला दिलेल्या मुलाखती मध्ये राम शिंदे यांनी पंकजा मुंडे वेगळा निर्णय घेण्याची शक्यता फेटाळून लावली. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी तळागाळापर्यंत पक्ष पोहोचवला. काँग्रेसची सत्ता असतानाही त्यांनी राज्यात मोठं काम केलं. त्यामुळे खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न दिल्याने भाजपचे अनेक पदाधिकारी नाराज झाले आहेत. त्यांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. त्यातही प्रीतम मुंडे दुसऱ्यांदा निवडून आल्या तर भागवत कराड एका वर्षापूर्वीच खासदार झाले. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर पंकजा मुंडे आपला निर्णय जाहीर करतील. पण पंकजा मुंडे या वेगळा निर्णय घेतील असं वाटत नाही, असं शिंदे म्हणाले.

 

तसेच पंकजा मुंडे यांचे समर्थक सकाळीच घोषणा देत पंकजा समर्थकांनी वरळी गाठली. या समर्थकांनी वरळीतील पंकजा मुंडे यांच्या कार्यालयासमोर मोठी गर्दी केली आहे. मुंडे भगिनींना सातत्याने डावलण्यात येत असून त्याचा निषेध म्हणून आम्ही राजीनामे दिले आहेत, असं या समर्थकांनी सांगितलं. तर, पंकजा मुंडे या समर्थकांची नाराजी दूर करून त्यांना राजीनामा मागे घेण्यास सांगणार असल्याचं सांगितलं जात आहे. पंकजा यांच्याकडून समर्थकांना सबुरीने घेण्याचा सल्लाही दिला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button