चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून; काळाखडक परिसरातील घटना
पिंपरी : चारित्र्याच्या संशयावरून पतीने त्याच्या पत्नीच्या डोक्यात कड्डप्पा फर्शी मारून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाकड येथील काळाखडक परिसरात सोमवारी (दि.०१) रात्री ही घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी रमेश हनुमंत पुजारी (वय ३५, रा. रामसुपर मार्केट, काळाखडक, वाकड) याला पोलीसांनी अटक केली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रमेश पुजारी आणि त्याची पत्नी ललीता रमेश पुजारी (वय ३० वर्षे) वाकड येथील काळाखडक परिसरात वास्तव्यास होते. पती रमेश आणि त्याची पत्नी ललीता यांच्यात अनेकदा वाद होत होते. चारित्र्याच्या संशयावरून रमेश वारंवार भांडण करत त्याच्या पत्नीला मारहाण देखील करत होता. सोमवारी रात्री पुन्हा त्यांच्यात भांडण झाले. यावेळी रागाच्याभरात रमेशने पत्नीच्या डोक्यात कड्डप्पा फरशी मारून तिचा खून केला. त्यानंतर आपल्या हातून खून झाल्याचे लक्षात येताच तेेथून रमेश पळून गेला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर काही वेळातच आरोपी रमेश पुजारी याला पोलीसांनी अटक केली आहे. पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.