Uncategorizedताज्या घडामोडी
राज्यात मुसळधार पाऊस सुरू : मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या रांगा
![Heavy rains continue in the state: Major traffic jams on Mumbai-Goa highway, queues of vehicles](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/Heavy-rains-continue-in-the-state.png)
रत्नागिरी : राज्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे आधीच वाहनांचा वेग कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशात मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली असल्याची माहिती हाती येत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाट बंद असल्यामुळे ही वाहतूक कोंडी झाली आहे. सततच्या पावसामुळे वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या आहेत.