breaking-newsTOP NewsUncategorizedआरोग्यताज्या घडामोडी

करोना रुग्णसंख्या वाढीबाबत मुंबईकरांना मिळाला ‘हा’ मोठा दिलासा

मुंबई : मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात करोनारुग्णांच्या संख्येत वाढ झाली नसल्याने दिलासा मिळाला आहे. राज्यात मुंबई आणि पालघरमध्ये नव्या करोनारुग्णांमध्ये वाढ झालेली नाही. नव्या रुग्णांत मुंबईमध्ये ११.४३ टक्के तर पालघरमध्ये ८.७९ टक्क्यांची घट झालेली दिसते.

१४ ते २० जून या कालावधीमध्ये मुंबईमध्ये १४,०८९ रुग्णसंख्या होती, तर २१ ते २७ जून या कालावधीमध्ये शहरात १२,४७९ नव्या रुग्णांची नोंद झाली. तुलनात्मकदृष्ट्या हे प्रमाण ११.४३ टक्क्यांनी कमी झाले आहे. ठाणे, पुणे, रायगड येथे रुग्णसंख्येमध्ये वाढ झालेली दिसते. सर्वाधिक रुग्णसंख्येची वाढ ही पुणे येथे झाली असून ती ६६.११ टक्के इतकी आहे. या पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये करोना रुग्णसंख्यावाढ ही १.५३ टक्के इतकी दिसून आली आहे. मात्र हे प्रमाण धास्तावण्याइतके जास्त नाही. राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये नव्या रुग्णसंख्येमध्ये झालेली वाढ ही ६१.८७ टक्के आहे. राज्यात मागील आठवड्याशी तुलना करता ५.०३ टक्के रुग्णवाढ झाल्याचे आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होते.

… अशी आहे स्थिती

उपचाराधीन रुग्ण

राज्य- २५,५७०

जिल्हा- उपचाराधीन रुग्ण

मुंबई – १२,४७९

ठाणे – ५,८७१

पुणे- ३,१६३

रायगड- १,४०१

पालघर- ७९५

नागपूर – ३६६

नाशिक – २२९

औरंगाबाद -११०

रत्नागिरी – ९७

बुलढाणा – ५५

उस्मानाबाद – ५४

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button