breaking-newsUncategorizedआंतरराष्टीयताज्या घडामोडीराजकारण

GoodNews: भारत संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य, 184 देशांचा पाठिंबा, पाकिस्तानचा तीळपापड

नवी दिल्ली : भारताला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे (UNSC) अस्थायी सदस्यत्व बहाल करण्यात आलेले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्य देशांनी भारताला बहुमताने मंजुरी दिल्याने आशिया कालखंडातून भारत बिनविरोध निवडून आला आहे. याबद्दल अमेरिकेकडून जोरदार स्वागत करण्यात आले आहे, तर पाकिस्तान मात्र चवताळल्याचे पाहायला मिळाले आहे.

अस्थायी सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी किमान 128 मतांची आवश्यकता असते. परंतु 192 पैकी 184 देशांनी भारताला भरभक्कम पाठिंबा दिल्यामुळे भारताची वाट सोपी झाली. 2021-22 या कालावधीसाठी अस्थायी सदस्य म्हणून भारताची निवड झाली आहे.

भारत हा आशिया कालखंडातून एकमेव उमेदवार होता. भारताने याआधी 2011-2012 कालावधीत अखेरचे सदस्यत्व भूषवले होते. भारत आठव्यांदा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य म्हणून निवडून आला आहे. यापूर्वी 1950-1951, 1967-1968, 1972-1973, 1977-1978, 1984-1985, 1991-1992 आणि 2011-2012 या कार्यकाळात भारताने सेवा बजावली होती.

193 सदस्यीय संयुक्त राष्ट्रसंघाच्या 75 व्या सत्रासाठी अध्यक्ष, सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य तसेच आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या सदस्यांसाठी निवडणुका झाल्या. भारतासह नॉर्वे, मेक्सिको आणि आयर्लंड यांनाही यूएनएससीमध्ये स्थान मिळालं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button