पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! कोरोनापाठोपाठ दिवाळीत डेंग्यू आणि चिकनगुनियाची रुग्णसंख्या घटली
![good-news-for-those-following-corona-the-number-of-dengue-and-chikungunya-cases-declined-on-diwali](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/pjimage-2021-11-13T202729.774.jpg)
पुणे | गेल्या वर्षीच्या तुलनेत सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर मध्ये शहरात डेंग्यू, टायफॉईड, चिकनगुनिया, कावीळच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून आली. ही वाढ रुग्णांमध्ये सरासरी 7 ते 10 टक्क्यांची होती. मात्र पावसाने दिलेली उघडीप आणि नागरिकांमध्ये करण्यात आलेली जनजागृती यामुळे गेल्या ऑक्टोबर महिन्यात शहरात डेंग्यू आणि चिकुनगुनियाचे रुग्ण सप्टेंबरच्या तुलनेत घटले आहेत. ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूचे रुग्ण १३ टक्क्यांनी, तर चिकुनगुनियाचे ४७ टक्क्यांनी घटले आहेत. ही घट नोव्हेंबर मध्ये देखील झाली आहे.शहर परिसरात सततच्या पावसाळी वातावरणामुळे साथीच्या रोगांचा फैलाव शहरात पाहायला मिळाला. तसेच गेल्यावर्षी लॉकडाऊनकाळात लोकांचं बाहेरचं खाणं बंद झालं होतं. त्यात गेल्यावर्षी पावसाळ्यातही अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना लॉकडाऊन काळात फारशी सूट नव्हती. त्यामुळे लोकांचा घराबाहेरचा वावर कमी होता. या कारणाने विषाणूजन्य आजारांचं प्रमाण दरवर्षीपेक्षा गेल्यावर्षी कमी झालं होतं. पण आता अनलॉक झाल्याने लोकांनी रस्त्यावरील खाद्यपदार्थ आणि जंकफूड खायला पुन्हा एकदा सुरूवात केली आहे. याचा परिणाम आता आरोग्यावर होऊ लागला आहे. परिणामी आजारांचं प्रमाण वाढत आहे.
डेंग्यू आणि चिकुनगुनिया हे दोन्ही आजार डासांपासून पसरतात. डासांची उत्पत्ती ही घरी किंवा सार्वजनिक ठिकाणी साठलेल्या पाण्यात होते. ती देखील स्वच्छ पाण्यात होते. यामध्ये फ्रीज, फुलांच्या कुंड्या, गच्चीवरीलअडगळीतील सामान अशा ज्या ठिकाणी पाणी साठून राहते त्यामध्ये होत असल्याचे आढळून आलेले आहे. सप्टेंबर महिन्यात शहरात डेंग्यूचे 192 रुण आढळले होते, तर चिकनगुनियाचे 80 रुग्ण आढळले होते.ती संख्या ऑक्टोबरमध्ये अनुक्रमे 168 आणि 38 झाली आहे. सप्टेंबरमधील रुग्णसंख्या सर्वाधिक ठरली होती. तर, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात डेंग्यूचे प्रत्येकी 86 रुग्ण आढळले होते आणि चिकनगुनियाचे अनुक्रमे 73 आणि 16 रुणांची नोंद झाली होती. आतापर्यंत शहरात डेंग्यूचे 563 तर चिकुनगुनियाचे 218 रुग्ण आढळून आले आहेत.
डेंग्यू डासांची अंडी आणि अळी सापडल्यास महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्रथम नोटीस देण्यात येते आणि नंतर दंड करण्यात येतो. यानुसार यावर्षी आरोग्य विभागाने 2,359 नोटीस पाठवल्या असून, डासोत्पत्तीप्रकरणी 1 लाख 75 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.[clear][clear][clear][clear]
[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]