सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी घसरण
दोन्ही धातुनी स्वस्ताईची आनंदवार्ता ,अशा आहेत किंमती?
![gold, silver, falling, metal, cheap, joy, news, price,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/11/sone-and-chandi-780x470.jpg)
दिल्ली : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले आहे. प्रचाराचा धुराळा उडाला आहे. तर दुसरीकडे सराफा बाजारात या आठवड्यात स्वस्ताईची पेरणी झाली आहे. सोने आणि चांदीत स्वस्ताई आली आहे. गेल्या आठवड्यात मौल्यवान धातुत चढउताराचे सत्र दिसले. आठवड्याच्या अखेरीस सोन्याने मोठी मुसंडी मारली तर चांदी नरमली होती. या आठवड्याच्या सुरुवातीलाच दोन्ही धातुनी ग्राहकांना दिलासा दिला. या आठवड्यात सोने धपकन आदळले. चांदीने माघार घेतली. युक्रेन-रशिया आणि इस्त्रायलविरुद्ध हमास, हिजबुल्लाह, इराण युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याला यश आले तर मौल्यवान धातुच्या किंमतीत घसरण होण्याची शक्यता आहे.
सोने फिरले माघारी
या आठवड्यात सोन्याने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. गेल्या आठवड्याच्या अखेरीस सोन्याने 900 रुपयांची मुसंडी मारली होती. गेल्या आठवड्यात सोने 1 हजारांहून अधिकने वधारले होते. तर या सोमवारी सोने 600 रुपयांनी घसरले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 72,350 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,910 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
गेल्या आठवड्यात चांदीला मोठी कामगिरी दाखवता आली नाही. सोने हजार रुपयांनी वधारले तर त्यात 4 हजारांची घसरण झाली होती. तर या आठवड्याच्या सुरुवातीला चांदी एक हजार रुपयांनी घसरली. तर आज सकाळच्या सत्रात चांदीत घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 93,000 रुपये इतका आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार 24 कॅरेट सोने 76,840 23 कॅरेट 76,532, 22 कॅरेट सोने 70,385 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 57,630 रुपये, 14 कॅरेट सोने 44,951 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 90,859 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
घरबसल्या जाणून घ्या भाव
सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.