गेट वेल सून मामु, बीडमध्ये होमहवन, बॅनरवर फडणवीसांचा फोटो
![गेट वेल सून मामु, बॅनरवर फडणवीसांचा फोटो, बीडमध्ये होमहवन](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/गेट-वेल-सून-मामु-बॅनरवर-फडणवीसांचा-फोटो-बीडमध्ये-होमहवन.jpg)
बीड : महाईन्यूज ।
बीड जिल्ह्यामध्ये एक अनोखं आंदोलन करण्यात आलं आहे. या आंदोलनाने सर्वांचचं लक्ष वेधलं आहे. ते म्हणजे ‘गेट वेल सून मामु’ आणि होम हवन करून देवेंद्र फडणवीस यांना लवकरच योग्य निर्णय घेण्याची बुद्धी यावी यासाठी हे हवन करून आंदोलन करण्यात आलं आहे. बीडमध्ये अनेक देवस्थानच्या हजारो एकर जमीन घोटाळा प्रकरणी हे आंदोलन करण्यात आलं आहे.
बीड जिल्ह्यातील आर्थिक गैरव्यवहार आणि वक्फ बोर्ड जमीन घोटाळ्यातील दाखल गुन्ह्यातील तपासी अधिकारी बदलण्याच्या निर्णयाच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. बीडमध्ये अनेक देवस्थानच्या हजारो एकर जमीन घोटाळा प्रकरणी अनेक अधिकाऱ्यांकडे जबाबदाऱ्या दिल्या. मात्र, अधिकाऱ्यांपासून जबाबदाऱ्या काढून दुसऱ्यांकडे देण्यात आल्या आहेत. बीड मधले चांगले अधिकारी हे शासन-प्रशासन योग्यरित्या काम करत असून देखील त्यांना पदावरून बदली करण्यात आली असल्याचं पाहायला मिळालं आहे. या सगळ्या गोष्टींसाठी बीडमध्ये सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी ‘गेट वेल सून मामू’ अशा आगळ्यावेगळ्या आंदोलनाने आणि चक्क जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच होम-हवन केल्याने हे आंदोलन बीड जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
या आंदोलनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आंदोलनाच्या बॅनरवर असल्याने अनेक नागरिक या आंदोलन काय आहे हे पाहण्यासाठी आंदोलनाकडे वळत होते. मात्र, जमीन घोटाळा प्रकरण वक्फ बोर्डाच्या जमिनी देवस्थानच्या जमिनीचे घोटाळे हे प्रकरण पंकज कुमावत सारख्या चांगल्या अधिकाऱ्याला द्यावे आणि अशा अधिकाऱ्याला जिल्ह्यात आणावे यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.