मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गॅस टँकर उलटला; अपघातात तिघांचा जागीच मृत्यू
![Gas tanker overturns on Mumbai-Pune expressway; All three died on the spot in the accident](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/मुंबई-पुणे-द्रुतगती-महामार्गावर-गॅस-टँकर-उलटला-अपघातात-तिघांचा-जागीच-मृत्यू.jpg)
पिंपरी : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर प्रोपोलिन गॅस टँकर उलटल्याची घटना घडली आहे. यामुळे घडलेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याहून मुंबईकडे हा टँकर जात होता. दरम्यान महामार्गावरच टँकर उलटल्याने दोन्ही बाजुची वाहतुक थांबविण्यात आली आहे.
खोपोली एक्झिट जवळ उतारावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला त्यामुळे टँकर पुणे लेन वर येऊन उलटला. यावेळी टँकरला गाड्या धडकल्याने भीषण अपघात घडला ज्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला.
बोरघाट पोलीस यंत्रणा, आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, लोकमान्य हॉस्पिटल, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहे. खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मदतकार्य सुरू आहे. सुदैवाने टँकरमधील गॅसची गळती झाली नाही. सध्या टँकर उभा करण्याचा प्रयत्न सुरू आहे.