breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

काँग्रेसच्या वाढत्या जनधारामुळे सोनिया गांधींची ‘ईडी’ चौकशी : डॉ. कैलास कदम

शहर काँग्रेसचे नाशिक फाटा चौकात सत्याग्रह आंदोलन

पिंपरी: मागील आठ वर्षांपासून केंद्रातील भाजप सरकारच्या हुकुमशाहीमुळे देश अराजक्तेकडे वाटचाल करीत आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वाढती महागाई, जुलमी राजवट या विरोधात काँग्रेस वेळोवेळी रस्त्यावर येऊन सामान्यांचे प्रश्न मांडत आहे. त्यामुळे देशभर सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा जनाधार वाढत आहे. याच्या भीतीपोटी मोदी शहा यांचे जुलमी सरकार हे सोनिया गांधी यांची वारंवार ईडीच्या नावाखाली चौकशी करून नाहक त्रास देत आहे अशी टीका काँग्रेसचे शहर अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी केली.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना ईडी मार्फत चौकशी करून केंद्र सरकार नाहक त्रास देत आहे. सुमारे १० वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी ईडीने हे प्रकरण संपवले. आता  पुन्हा हे प्रकरण पुनरुज्जीवित केले. या मोदी सरकारच्या जुल्माविरोधात आज संपूर्ण देशात सत्याग्रह केला जात आहे.

पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली नाशिक फाटा चौक, कासारवाडी येथे सत्याग्रह सुरूच ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे आणि जोपर्यंत सोनिया गांधी यांना चौकशीनंतर परत येऊ दिले जात नाही तोपर्यंत आमचा सत्याग्रह सुरूच राहील असे कदम यांनी सांगितले.

या सत्याग्रह आंदोलनात माजी महापौर कवीचंद भाट, ज्येष्ठ नेत्या निगार बारस्कर, माजी नगरसेवक बाबू नायर, माजी नगरसेविका निर्मला कदम, महिला शहराध्यक्ष सायली नढे, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, दिलीप पांढरकर, युवक अध्यक्ष कौस्तुभ नवले, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विठ्ठल शिंदे, अॅड. उमेश खंदारे, सहकार सेल अध्यक्ष के. हरिनारायण, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष अभिमन्यू दहीतुले, सज्जी वर्की, भाऊसाहेब मुगुटमल, डॉ. मनीषा गरूड, नंदा तुळसे, छायावती देसले, अनिता अधिकारी, निर्मला खैरे, भारती घाग, स्वाती शिंदे, सुनीता गायकवाड, वैशाली दमवानी, आशा भोसले, दिपाली भालेकर, सुप्रिया पोहरे, सुप्रिया कदम, शिवानी भाट, विजय ओव्हाळ, झेव्हिअर अंथोनी, उमेश बनसोडे, तारिक रिजव्ही, अर्जुन लांडगे, किरण खाजेकर, अण्णा कसबे, उमेश बनसोडे, आकाश शिंदे, विशाल सरवदे, सौरभ शिंदे, इमरान शेख, किरण नढे, मिलिंद फडतरे, मधुसूदन ढोकळे, नितीन खोजेकर, आबा खरडे, जुबेर खान स्वप्निल नवले, स्वप्निल बनसोडे, अबूबकर लांडगे, रोहित शेळके, राजाराम भोंडवे, सतीश भोसले, बाबा बनसोडे, गौतम ओव्हाळ, पांडुरंग जगताप, पंकज पवार, करीम पूना, मनोहर गडेकर, चंद्रकांत उमरगीकर, इस्माईल संगम, बी. बी. शिंदे, संदीप शिंदे, हरीश डोळस, राहुल ओव्हाळ, मेहबूब शेख, रवि कांबळे, हमिद इनामदार, रवि नांगरे, हिरा जाधव, सचिन सोनटक्के आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button