मोठ्या प्रकल्पाचं निव्वळ चॉकलेट देऊ नका, अशोक चव्हाणांचा घणाघात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/09/ashok-chavan-768x416-1.jpg)
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
वेदांत-फॉक्सकॉन हा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यानंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. या सर्व आरोप प्रत्यारोपांनंतर आता वेदांता ग्रुपचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिले होते. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेदांता कंपनीचे आभार मानत विरोधकांवर निशाणा साधला होता.यानंतर काँग्रेसनेते अशोक चव्हाण यांनी एक ट्वीट केले आहे. याट्वीटमध्ये त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली.
ट्वीटमध्ये काय? –
२४ जूनला नवी दिल्लीत वेदांता-फॉक्सकॉन तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना अनुकूल प्रतिसाद देते. २६ जुलैला नवीन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमवेत कंपनीचे संचालक सुहास्यवदनाने छायाचित्रे काढतात. हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री विधानसभेत देतात. तरीही हा प्रकल्प अचानक गुजरातला का जातो, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. नवीन सरकारने महाविकास आघाडीकडे बोट दाखवण्यात काहीही अर्थ नाही. त्यापेक्षा हा प्रकल्प परत आणण्याचे प्रयत्न करणे राज्यासाठी अधिक हितावह ठरेल.
हातचं सोडून पळत्याच्या मागे लागण्यात अर्थ नाही. राज्याने केंद्राला सांगावं की भविष्यात जो मोठा प्रकल्प तुम्ही महाराष्ट्राला देऊ करता आहात, तो आमच्या एखाद्या अविकसित भागात द्याच. पण अगोदर पळवून नेलेला वेदांता-फॉक्सकॉन परत करा. भविष्यातील मोठ्या प्रकल्पाचं निव्वळ चॉकलेट देऊ नका, असे ट्विट त्यांनी केले आहे.
२४ जूनला नवी दिल्लीत वेदांता-फॉक्सकॉन तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना अनुकूल प्रतिसाद देते.
२६ जुलैला नवीन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसमवेत कंपनीचे संचालक सुहास्यवदनाने छायाचित्रे काढतात.
हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री विधानसभेत देतात.
१/२— Ashok Chavan (@AshokChavanINC) September 14, 2022