Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

धनंजय मुंडे यांचा गोंधळ, नव्या अध्यक्षांचा केला मिलिंद नार्वेकर असा उल्लेख

मुंबई । विधानसभेचे नवे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांची गडबड झाली. ‘सन्माननीय मिलिंद नार्वेकर साहेब’ हे वाक्य धनंजय मुंडे यांनी उच्चारल्यानंतर समोरच्या बाकावरील सदस्यांनी ‘राहुल राहुल’ असा आवाज करून विधानसभा अध्यक्ष मिलिंद नार्वेकर नव्हे तर राहुल नार्वेकर झाल्याचे मुंडे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर धनंजय मुंडे हे थोडे सावरले.

‘माझे मित्र मिलिंद नार्वेकर यांच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलायला मी उभा आहे. तितक्यात अन्य सदस्यांनी हे वाक्य कामकाजातून काढून टाका’, अशी मागणी केली. ‘ते विधान काढून टाकण्यात येईल’ असे नवनिर्वाचित अध्यक्ष नार्वेकर यांनी स्पष्ट केले. विधानसभा अध्यक्षांच्या नावाची गफलत झाल्याचे लक्षात आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी त्यांच्या व शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या भेटीची कहाणी सांगण्याचा प्रयत्न केला. ‘माझी आणि आदित्यजी यांची सकाळी लिफ्टमध्ये भेट झाली. याला कारण व संदर्भही तसा आहे. आपण उपमुख्यमंत्री झाल्यावर मी अभिनंदन करायला आलो होतो. त्याच दरम्यान मिलिंदही गेले होते, असे आदित्य यांनी आपणास सांगितले. कोण पुढच्या दाराने गेले, कोण मागच्या दाराने गेले म्हणून तेच लक्षात राहिले’, असे धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button