ऑनलाइन ऑर्डर घेऊन आलेल्या डिलिव्हरी बॉयचे तरुणीसमोरच अश्लील कृत्य, गुन्हा दाखल
![Delivery boy who brought online order commits obscene act in front of a young woman](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/crying-woman-1.jpg)
पुणे | ऑनलाईन ऑर्डर घेऊन घरी आलेल्या डिलिव्हरी बॉयने तरुणीसोबत अश्लील कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोंढवा येथील एका उच्चभ्रू सोसायटीत ही घटना घडली. संबंधित तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर एका डिलिव्हरी बॉयवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या 23 वर्षे वयाच्या आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी ऑनलाइन शॉपिंगद्वारे लॅपटॉप बॅग ऑर्डर केली होती. एक डिसेंबर रोजी संबंधित लॅपटॉप बॅग घेऊन एक कर्मचारी घरी आला. या कर्मचाऱ्याने फिर्यादीसमोरच अश्लील कृत्य केले. या घटनेमुळे फिर्यादीच्या मुलाला लज्जा उत्पन्न झाली. त्यानंतर आरोपी तिथून निघून गेला.
दरम्यान फिर्यादीने हा सर्व प्रकार आईला सांगितला आईने सबंधित डिलिव्हरी बॉयला जाब विचारण्यासाठी फोन केला असता त्याने “मी कोणालाही घाबरत नाही, काय करायचे ते करा” असे बोलून फिर्यादीच्या आईला धमकी दिली. कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.