Crime: काय सांगता! फक्त सिगारेट उधार न दिल्याने पानटपरी चालकाची हत्या
![Pan Shop Owner killed for only a cigarette in Bandra](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/Pan-Shop-Owner-killed-for-only-a-cigarette-in-Bandra.jpg)
मुंबईः फक्त एक सिगारेट उधार न दिल्याने दोन नशेबाजांनी पानटपरी चालकाची हत्याच केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वांद्रे येथील निर्मलनगर परिसरात ही हत्या झाली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांना आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
मुदस्सिर खान असे मृत विक्रेत्याचे नाव असून वांद्रे पूर्वेकडील नौपाडा परिसरात त्यांची पानटपरी आहे. बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास त्याने नेहमीप्रमाणे दुकान उघडले. दुकान उघडल्यानंतर समीर आणि शाहू हे दोघे तरुण या ठिकाणी आले. आधीच गुन्हेगार असलेल्या दोघांनी मुदस्सिर यांच्याकडे उधारीवर सिगारेट मागितली. यापूर्वीची उधारी असल्याने आणि सकाळची वेळ असल्यामुळे मुदस्सिर यांनी सिगारेट देण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या दोघांनी चाकूने मुदस्सिर यांच्यावर वार केले.
नशेत धुंद दोघेही इतक्या जोरजोरात चाकू मारू लागले की, बचाव करण्यासाठी पुढे सरसावलेला मुदस्सिर यांचा भाऊ आणि आईदेखील या हल्ल्यात जखमी झाले. रक्तस्त्राव झाल्याने मुदस्सिर याचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला.