पुणे-पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा महायुतीच सत्तेत येईल : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ
पुणे-पिंपरी-चिंचवड, पुणे उत्तर, पुणे दक्षिण संघटनात्मक ‘‘जिल्हा निवडणूक प्रभारी’’पदी जबाबदारी
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड या महापालिकांसाठी तर पुणे जिल्हा परिषदेसाठी भारतीय जनता पार्टीचा निवडणूक प्रभारी म्हणून दायित्व दिल्याबद्दल मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष मा.श्री. रविंद्रजी चव्हाण यांचे मनापासून धन्यवाद ! पक्ष क्षेष्ठींनी दिलेली जबाबदारी पूर्ण क्षमतेने आणि यशस्वीपणे पूर्ण करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील भाजपा संघटनात्मक बांधणीतील पुणे, पिंपरी-चिंचवड, पुणे उत्तर आणि पुणे दक्षिण अशा चारही संघटनात्मक जिल्ह्यांकरिता निवडणूक प्रभारी म्हणून मुरलीधर मोहोळ यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
मुरलीधर मोहोळ म्हणाले की, केंद्रात मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएचे तर राज्यात मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार सत्तेवर आहे. विकासाभिमुख धोरणांची आखणी आणि त्याची वेगवान अंमलबजावणी हे केंद्र आणि राज्य सरकारचे वैशिष्ट्य आहे.पुणे, पिंपरी-चिंचवड आणि परिसरात सध्या जी विकासकामे सुरु आहेत, ती वेगाने पुढे नेण्यासाठी, नव्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी आणि भविष्यातील पुणे घडविण्यासाठी मतदार भारतीय जनता पार्टीच्या पाठिशी ठामपणे उभे राहतील, हा विश्वास आहे. मा. देवेंद्रजींच्या नेतृत्वात हा विकासाचा गाडा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून असाच पुढेही सुरु राहिल ! त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदार नक्कीच भारतीय जनता पक्ष आणि महायुतीवर विश्वास दाखवतील. पुणे महानगरपालिका, पुणे जिल्हा आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप, महायुतीच सत्तेवर येईल !




