भोसरी प्रभाग क्र.७ मध्ये भाजपाचा जोरदार प्रचार; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भोसरी : भोसरी प्रभाग क्रमांक ७ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने जोरदार व प्रभावी प्रचार करण्यात येत आहे. सकाळपासूनच प्रचाराला वेग आला असून भाजपाचे चारही अधिकृत उमेदवार आणि शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
भाजपाचे अधिकृत उमेदवार संतोष लोंढे, सोनालीताई गव्हाणे, राणीमाई पठारे आणि अॅड. नितीन लांडगे यांच्या उपस्थितीत प्रचाराला सुरुवात झाली. यावेळी प्रभागातील दीडशेहून अधिक कार्यकर्ते व नागरिक प्रचारात सक्रियपणे सहभागी झाले होते.
हेही वाचा – इंद्रायणी नगर प्रभाग ८ मध्ये भाजपाची जोरदार पदयात्रा; आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत ‘महाविजय संकल्प’
दुपारी दिघी रोड येथील सांगवी कॉलनी परिसरात घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत प्रचार करण्यात आला. संध्याकाळी किसन बबन लांडगे, विजय बबन लांडगे, काळूराम पवळे, दत्तात्रय पांडुरंग फुगे, बाजीराव शंकर लांडगे, बाळासाहेब आनंदा लांडगे, राजाराम नथू लोंढे, श्रीकांत लांडगे, सागर डोळस, रमेश पठारे, संजय पठारे, सूरदास फुगे आदी प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शीतलबाग परिसरात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. यानंतर घराघरांत जाऊन प्रचार करण्यात आला.
या संपूर्ण प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने उपस्थित राहून नागरिकांनी भाजपाच्या विकासकामांवर आपला विश्वास व्यक्त केला. नागरिकांचा वाढता उत्साह आणि सकारात्मक प्रतिसाद पाहता भोसरी प्रभाग क्रमांक ७ मधून भाजपाचे चारही उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.



