Uncategorizedताज्या घडामोडीविदर्भ
जालन्यात मोठी कारवाई, स्टील व्यावसायिकांकडे सापडलं घबाड, ५८ कोटींच्या नोटा, ३२ किलो सोनं
![Big action in Jalna, steel businessmen found scum, notes worth 58 crores, 32 kg gold](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/Big-action-in-Jalna-steel-businessmen-found-scum-notes-worth-58-crores-32-kg-gold.jpg)
जालना: राज्यातील सत्तांतरानंतर जालना जिल्ह्यात आयकर विभागाकडून मोठा छापा टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. १ ऑगस्टपासून जालन्यातील स्टील व्यावसायिकांवर हे छापे टाकायला सुरुवात झाली होती. या छापेमारीत एकूण ३९० कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता हाती लागल्याची माहिती आहे. यामध्ये ५८ कोटी रुपयांची रोकड आणि ३२ किलो सोन्याचा समावेश आहे. प्राप्तीकर खात्याचे तब्बल २६० कर्मचारी या छापेमारीत सहभागी झाले होते. या छापेमारीदरम्यान मोठी रोकड जप्त करण्यात आली. ही रोकड मोजण्यासाठी आयकर विभागाने १२ मशिन्स वापरल्या. मात्र, इतक्या मशिन्स वापरुनही ही सर्व रोकड मोजण्यासाठी तब्बल १४ तासांचा अवधी लागला. यावरून मराठवाड्यातील ही कारवाई किती मोठी असेल, याचा अंदाज येऊ शकतो.