Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

नरीमन पॉइंट येथील मनोरा आमदार निवासाच्या जागी ; कुलाब्यात राहुल नार्वेकरांच्या नावाने अफवा पसरली…

मुंबईः नरीमन पॉइंट येथील मनोरा आमदार निवासाच्या  जागी सरकारने झोपड्या बांधण्याची परवानगी दिली आहे, अशी अफवा बुधवारी पसरली आणि शेकडो लोकं बांबू, दोर घेऊन भूखंडावर पोहोचले होते. काही जणांनी कुलबा मतदारसंघाचे आमदार व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी झोपड्या बांधण्यास परवानगी दिल्याची अफवा पसरवली होती. पोलिसांना या बाबत माहिती देताच त्यांनी तातडीने सूत्रे हातात घेतली व परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

राहुल नार्वेकर हे कुलाबा मतदारसंघाचे आमदार आहेत. येत्या रविवारीच त्यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे. नार्वेकर यांच्या नावाने काही अफवा पसरवण्यात आल्या होत्या राहुल नार्वेकर यांनी मनोर आमदार निवासाचा एक भूखंड गरिबांना झोपड्या बांधण्यासाठी दिला आहे. या अफवेनंतर कफ परेड लोकांनी गर्दी केली. असंख्य जण बांबू, दोर घेऊन या भूखंडावर पोहोचले होते. अनेकांनी झोपड्यांच्या आकाराचे चौकोन देखील उभारले होते. या संपूर्ण प्रकारामुळं एकच गोंधळ उडाला होता.

काही जणांनी कुलाब्याचे आमदार व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी झोपड्या बांधण्यास परवानगी दिली आहे, अशी अफवा देखील उठवून दिली. ही बाब नार्वेकर यांना समजताच त्यांनी पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. पोलिस कारवाईनंतर झोपडी बांधण्यासाठी आलेल्या लोकांनी येथून पळ काढला व हा भूखंड पुन्हा मोकळा झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ४० जणांना ताब्यात घेतलं आहे. तसंच, गुन्हाही नोंदवला आहे.

मनोरा आमदार भूखंड

मनोरा आमदार निवासस्थान पाडण्यात आलं आहे. या ठिकाणी नवीन आमदार निवास इमारत बांधण्यात येणार आहे. मात्र, हा भूखंड झोपड्या बांधायला परवानगी दिली आहे, अशी अफवा कोणी पसरवली हे मात्र अद्याप स्पष्ट झालं नाहीये.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button