Uncategorizedताज्या घडामोडी
आमदार आशीष जयस्वाल यांच्याशी असभ्य वर्तन करणे रामटेक पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाला भोवले
![Assistant Police Inspector of Ramtek Police Station accused of misbehaving with MLA Ashish Jaiswal](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/Assistant-Police-Inspector-of-Ramtek-Police-Station-accused-of-misbehaving-with-MLA-Ashish-Jaiswal.jpg)
नागपूर : आमदार आशीष जयस्वाल यांच्याशी असभ्य वर्तन करणे रामटेक पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाला भोवले. पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत एपीआयला निलंबित केले. विवेक सोनवणे,असे निलंबित अधिकाऱ्याचे नाव आहे.
सावनवणे यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केली. माहिती मिळताच आमदार जयस्वालही पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. सोनवणे यांनी आ.जयस्वाल यांच्यासोबत असभ्य वर्तण केले. जयस्वाल यांनी पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्याकडे तक्रार केली.
मगर यांनी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना प्रकरणाच्या चौकशीचे निर्देश देत सोनवणे यांची ग्रामीण पोलिस नियंत्रण कक्षात बदली केली. चौकशीत दोषी आढळल्यानंतर सोनवणे यांना निलंबित करण्यात आले.