स्वातंत्र्य दिनी तुम्ही वेगळा लूक करणार आहेत काय? वाचा आमच्या टीप्स…
![Are you going to do a different look on Independence Day? Read our tips...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/look-on-Independence-Day.jpg)
पुणे : महिलांसाठी एखाद्या विशेष इव्हेंटसाठी स्पेशल लूक करण्याची वेगळीच मजा असते. यंदाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाला सुद्धा तुम्ही काही तरी वेगळा लूकचा विचार करीत असाल, तर या काही स्टायलिश टिप्स तुमची मदत करतील. तुमच्याकडे नवीन कपडे नसले तरी काळजी करण्याची गरज नाही, त्याऐवजी तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमधून काही ड्रेसेस टीमअप करून तुमचा नवीन स्टायलिश लुक तयार करू शकता.
पांढरा टॉप
जर तुम्हाला वेस्टर्न ड्रेस घालण्याचा शौक असेल तर पांढरा शर्ट किंवा टॉपसोबत ग्रीन ट्राउजर घालू शकता. यासोबत जर ऑरेंज कलरचा स्टोल किंवा स्कार्फ टीमअप केला तर तुम्ही नक्कीच अप टू डेट दिसाल.
सलवार सूट
व्हाईट कलरचा कुर्ता प्रत्येक मुली जवळ असतो. अशा परिस्थितीत पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यासोबत तुम्ही ऑरेंज दुपट्टा आणि हिरवी सलवार घालू शकता. यामुळे तुमचा एथनिक लूक खूप छान होईल. यासोबत तुम्ही ट्राय कलर बिंदी किंवा ट्राय कलर बांगड्या सुद्धा घालू शकता.
लाँग स्लिट कुर्ता
लाँग स्लिट कुर्ता देखील खूप चांगला पर्याय आहे. तुम्ही पांढऱ्या रंगाचा कुर्ता घालू शकता. यासोबत ग्रीन ट्राउजर छान दिसते. त्याचबरोबर निळ्या रंगाचा लाँग स्लिट कुर्ता आणि व्हाइट ट्राउजर किंवा पँट टीमअप करून तुम्ही कंप्लीट लूक मिळवू शकता. तुम्ही यासोबत ट्राय कलर ज्वेलरी सुद्धा कॅरी करू शकता.
साडी
जर तुम्हाला स्वातंत्र्यदिनी साडी नेसायची असेल तर तुम्ही केशरी किंवा हिरव्या रंगाची साडी घालू शकता. दुसरीकडे, तुमच्याकडे केशरी किंवा हिरव्या रंगाची साडी नसली तरी तुम्ही पांढर्या साडीसोबत ऑरेंज ब्लाउज किंवा क्रॉप टॉप घालू शकता. तुम्ही सिंपल व्हाइट साडीसोबत तिरंगी ज्वेलरी सुद्धा ट्राय करू शकता.