कोडिंग स्पर्धा जिंकून नागपूरच्या तरुणाला अमेरिकेतील कंपनीत नोकरी मिळाली, वय आडवं आलं अन्…
![After winning a coding competition, a young man from Nagpur got a job in a company in America, aged and...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/After-winning-a-coding-competition-a-young-man-from-Nagpur-got-a-job-in-a-company-in-America-aged-and....jpg)
नागपूरः आईच्या जुन्या लॅपटॉपवरुन काम करत असताना इन्स्टाग्रामवर एक वेबसाइट डेव्हलपमेंट स्पर्धेबाबत माहिती मिळाली. या स्पर्धेत तो सहभागीही झाली. दोन दिवसांत स्पर्धेची तयारी करुन कोडिंग केलं आणि एका अमेरिकेतील कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळाली. वार्षिक पगार ३३ लाखही ठरला. पण त्याच्या या यशात त्याचे वय आडवे आले त्यामुळं स्वप्नातल्या नोकरीवर नागपूरच्या वेदांत देवकाटेला पाणी सोडावे लागले.
न्यू जर्सीच्या एका जाहिरात कंपनीकडून वेदांतची निवड झाली होती. जवळपास १००० प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देत वेदांतने ही स्पर्धा जिंकली होती. या कंपनीकडून वेदांतला एचआरडी टीममध्ये सहभागी होऊन वर्क असाइनबरोबरच कोडर्सचे काम सोपवण्यात आले होते. मात्र, वेदांतचं वय वर्ष फक्त १५ असल्यामुळं कंपनीने हा प्रस्ताव मागे घेतला.
कंपनीने वेदांतला निराश न होता शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर नोकरीसाठी पुन्हा तुला संपर्क करु, असा विश्वासही दिला आहे. कंपनीने वेदांतला लिहलेल्या मेलमध्ये, आम्ही तुमचा अनुभव आणि हुशारीने प्रभावित झालो आहोत. आमच्या टीमला तुम्ही दिलेले प्रेझेंटेशन आवडले आहे, असं म्हटलं आहे.
वेदांतने एक वेबसाइट बनवली होती. ज्यामध्ये युट्यूबसारखे व्हिडिओ अपलोड करण्याचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. ज्यात ब्लॉग, व्लॉग, चॅटबॉट आणि एक व्हिडिओ पाहू शकता. याचबरोबर, त्यावर कोणीही आपली एक प्रोफाइल बनवून लाइव, फॉलोवर्स आणि लाइक्स मिळवू शकतात. एचटीएमएल, जावास्क्रिप्ट आणि व्हर्चुअल स्टुडिओ कोड (२०२२)चा वापर केला आहे.
वेदांतने नारायण ई-टेक्नो वाथोडा आपल्या शाळेत एक रडार सिस्टम मॉडल डिजाइन तयार केले होते. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं होतं. वेदांतचे वडिल राजेश आणि आई अश्विनी नागपूरमधील एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असिस्टेंट प्रोफेसर आहेत.
लॉकडाऊनमध्ये मी ऑनलाइन क्लाससाठी इंटरनेटवर शोध घेतला. लॉकडाऊनमध्येच सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, कोडिंग आणि पायथन सारखे विषयांवर दो डझन ट्युटोरिअल सेशन अटेंड केले आहेत. वेबसाइट डेव्हलप करण्यासाठी वेदांतने जुन्या लॅपटॉपवर काम केलं होतं. राजेश आता वेदांतसाठी नवीन लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत आहेत.
आम्हाला याबाबत काहीच माहिती नव्हती. एकदिवस मुलाच्या शाळेतून फोन आला आणि त्यांनी नोकरीच्या ऑफरबद्दल सांगितलं. वेदांतला अमेरिकेतील कंपनीकडून ईमेल मिळाला तेव्हा आमचा विश्वासच बसत नव्हता, असं वेदांतच्या वडिलांनी सांगितलं.