breaking-newsTOP NewsUncategorizedआंतरराष्टीयदेश-विदेशराष्ट्रिय

अफगाणिस्तान हादरले ! हेरात मशीद परिसरात बॉम्बस्फोट; 14 जणांचा मृत्यू

हेरात । महान्यूज । वृत्तसंस्था ।

अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतातील गुजरगाह मशिदीत झालेल्या बॉम्बस्फोटात 14 जण ठार तर 200 जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतातील गुजरगाह मशिदीत झालेल्या बॉम्बस्फोटात 14 जण ठार तर 200 जण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या स्फोटात मशिदीचे इमाम मौलवी मुजीब रहमान अन्सारी यांचा मृत्यू झाला आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, स्फोटात गंभीर जखमी झालेल्यांना रक्ताची गरज असून रुग्णालयात सध्या रक्त नाही, असे समजते. डॉक्टरांची संख्या फार कमी आहे. स्फोटानंतरचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आले आहेत. या व्हिडीओत, हेरातमधील गुजरगाह मशिदीत झालेल्या स्फोटानंतर मोठे नुकसान झाले आहे. या स्फोटात मोठ्या प्रमाणात जीवितहानी अधिक झाली आहे.

हेरातमधील गुजरगाह मशिदीमध्ये झालेल्या स्फोटात इस्लामचे महान विद्वान आणि धार्मिक नेते मानले जाणारे मौलवी मुजीब अन्सारी यांचा मृत्यू झाला. अन्सारी हे तालिबानशी संबंधित प्रमुख धार्मिक नेत्यांपैकी एक होते. मौलवी मुजीब रहमान अन्सारी हे तालिबानचे जवळचे आणि कट्टर धर्मगुरू मानले जात होते.

अफगाणिस्तानातून अमेरिकेच्या नेतृत्वाखालील सैन्याने माघार घेतल्याचा पहिला वर्धापन दिनही तालिबानने साजरा केला. ज्यामध्ये परदेशी सैनिकांनी सोडलेली लष्करी उपकरणे परेडमध्ये प्रदर्शित करण्यात आली होती. असे असूनही, तालिबान सरकारला आंतरराष्ट्रीय स्तरावर कायदेशीर सरकार म्हणून स्वीकारणाऱ्या देशांची संख्या कमी आहे.

अफगाणिस्तानातील बॉम्ब स्फोटांचं सत्र सुरुच आहे. मशिदींमध्ये नमाज पठण करणाऱ्या लोकांवर हल्ले देखील सुरु आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं बॉम्ब स्फोट करण्यात येत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button