Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यू

मुंबई: शिवसंग्राम संघटनेचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूवरून सध्या उलटसुलट चर्चांचे मोहोळ उठले आहे. विनायक मेटे यांच्या गाडीला झालेला अपघात हा घातपातच होता, अशी शक्यता अनेकांकडून बोलून दाखवली जात आहे. अशातच आता शिवसंग्राम संघटनेच्या एका कार्यकर्त्याने खळबळजनक दावा केला आहे. काही दिवसांपूर्वी पुणे परिसरात विनायक मेटे यांच्या गाडीचा पाठलाग झाला होता. तेव्हादेखील एक आयशर ट्रक मेटे यांच्या गाडीला कट मारत होता, असा दावा शिवसंग्रामच्या कार्यकर्त्याने केला आहे. त्यामुळे आता विनायक मेटे मृत्यूप्रकरणाच्या तपासाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.

‘टीव्ही ९ मराठी’ने शिवसंग्राम संघटनेच्या अण्णासाहेब वायकर या कार्यकर्त्याशी फोनवरून संवाद साधला. तेव्हा अण्णासाहेब वायकर यांनी एक खळबळजनक दावा केला. ३ ऑगस्टला पुण्यात विनायक मेटे यांच्या गाडीचा पाठलाग झाल्याची माहिती वायकर यांच्या एका सहकाऱ्याने त्यांना दिली. त्यावेळी विनायक मेटे बीडहून पुण्याला परतत होते. मेटे यांची गाडी पुण्यापासून साधारण २० किलोमीटर अंतरावर असताना एक आयशर ट्रक आणि कारने त्यांचा पाठलाग करायला सुरुवात केली. त्यावेळी चॉकलेटी रंगाच्या आयशर ट्रकने विनायक मेटे यांच्या गाडीला दोन-चारदा कट मारली. कारमध्ये बसलेले दोन-चारजण ट्रक मागे घे, पुढे घे, असे सांगत होते. त्यावेळी मेटे यांच्या कार्यकर्त्याने गाडी थांबवून त्यांना जाब विचारूयात,असेही म्हटले. पण विनायक मेटे म्हणाले की, जाऊ दे, ते दारू पिऊन असतील. साधारण २ किलोमीटरच्या अंतरापर्यंत आयशर ट्रक आणि ती कार मेटे यांच्या मागावर होती, असे शिवसंग्रामच्या कार्यकर्त्याने सांगितले.

ही घटना घडली त्यावेळी विनायक मेटे यांच्यासोबत असणाऱ्या कार्यकर्त्यासोबतही वायकर यांनी फोनवरून बोलणे करुन दिले. त्याने या प्रकाराला दुजोरा दिला. आम्ही ३ तारखेला पुण्याकडे परतत होतो. आम्हाला मिटिंगसाठी पुण्यात जायचे होते. तेव्हा रात्री ११ वाजता शिक्रापूर परिसरात हा प्रकार घडला. त्यावेळी समाधान वाघमारे हा मेटे यांची गाडी चालवत होता. मी तेव्हा साहेबांना गाडी बाजूला घेऊयात, असे बोललोही, अशी माहिती संबंधित कार्यकर्त्याने दिली.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button