Uncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सोमवारच्या घसरणीनंतर आज शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात
सोमवारच्या घसरणीनंतर मंगळवारी शेअर बाजार सावरल्याचे दिसले. मंगळवारी शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 696 अंकांनी तर निफ्टी 197 अंकानी वधारला. त्यानंतर आजही शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाल्यानंतर सकारात्मक संकेत दिसून आले. आज सकाळी सेन्सेक्स 200 अंकांची आणि निफ्टी जवळपास 90 अंकांची उसळी घेत सुरू झाला. म्हणजेच सेन्सेक्स 58,198 अंकांवर, तर निफ्टी 17405 अंकांवर उघडला. युक्रेनच्या शांततेच्या पुढाकाराच्या संकेतांनी जागतिक पातळीवरील शेअर बाजारात सकारात्मक वातावरण आहे.
दरम्यान, मंगळवारी शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली खरी, पण युरोपियन बाजार सकारात्मकतेने उघडल्याने देशांतर्गत बाजारानेही नंतर चांगली रिकव्हरी केली. ऑटो बँक आयटी, ऑईल अँड गॅस शेअर्समध्ये जोरदार खरेदीमुळे सेन्सेक्स-निफ्टी 1 टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले.





