breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमराठवाडा

‘निशे’मुळे ‘तिच्या’ आयुष्यात उगवली नवी पहाट; शिवसेनेच्या वाघिणीचे सर्वत्र होतेय कौतुक

चंद्रपूर: कोणत्याही परिणामांची तमा न बाळगता, अडचणीच्या काळात एका गर्भवती महिलेच्या मदतीसाठी धावून जात चंद्रपुरातील निशा घोंगडे यांनी समाजापुढे आदर्श उदाहरण ठेवले आहे. जिल्ह्यातील कोरपणा तालुक्यातील एका गर्भवती महिलेला प्रसूतीचा कळा सुरू झाल्या. त्या नंतर तेथील डॉक्टरांनी वैद्यकीय गुंतागुंत असल्याने बाळ आणि आईच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले. ती वेळ होती रात्री १२ वाजताची. महिलेला तातडीची वैद्यकीय मदत हवी होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत निशा घोंगडे वेळीच मदतीसाठी धाव घेतली. (shiv sena women coordinator nisha ghongde appriciated for helping woman in chandrapur)

डॉक्टरानी या महिलेला चंद्रपुरातील वैद्यकीय महाविद्यालयात पाठवले. गर्भवती महिलेच्या मैत्रिणीने चंद्रपुरातील कार्यकर्त्या निशा घोंगडे यांना मोबाइलद्वारे संपर्क करून करून मदत मागितली. काळाकुट्ट अंधार असतानाही कशाचीही पर्वा न करता मदतीसाठी धावून गेल्या. महिलेची प्रसूती व्यवस्थित पार पाडल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडत निशा घोंगडे यांचे कौतुक केले आहे. घोंगडे या शिवसेनेच्या उपजिल्हा महिला समन्वयक असून त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना शिवसेनेची वाघीण म्हटले जाऊ लागले आहे.

एक महिलेच्या प्रसूतीत गुंतागुंत निर्माण झाल्याने मदतीची गरज असल्याने निशा घोंगडे यांनी धाव घेत थेट चंद्रपुरातील वैद्यकीय महाविद्यालयात पोहोचल्या. त्यांनी त्या महिलेला रुग्णालयात दाखल करत डॉक्टरांना मदत करण्याची विनंती केली. डॉक्टरांनी परिस्थिती कठीण असल्याचे सांगितले. मात्र निशा घोंगडे यांनी डॉक्टरांना, ‘तुम्ही तुमचे प्रयत्न करा, चांगले किंवा वाईट होईल, त्याची जबाबदारी मी घेते’, अशा शब्दात आश्वस्त केले. निशा यांनी दाखविलेल्या या हिमतीमुळे डॉक्टर देखील अवाक् झाले.

निशा घोंगडे यांनी प्रसुतीगृहात जाऊन त्या महिलेची भेट घेतली. त्यांनी तिला सकारात्मक विचार करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर बाहेर येत त्यांनी बाळंतपण सुखरूप होण्यासाठी प्रार्थना केली. काही वेळाने त्या महिलेची प्रसूती झाल्याची बातमी त्यांच्या कानावर पडली. बाळ आणि आई दोघेही सुखरूप आहेत असे समजल्याव सर्वांचाच जीव भांड्यात पडला.

खरे तर निशा या शब्दाचा अर्थ होतो रात्र. पण याच ‘निशा’मुळे त्या गर्भवती महिलेच्या आयुष्यात नवी पहाट उजळली. त्या गोंडस मुलाला हातात घेताच निशा यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. रात्रभर केलेली मेहनत कामी आल्याचे समाधान त्यांना वाटले.

प्रसूतीनंतर शुद्धीवर येताच महिलेने निशा यांचे आभार मानले. आता शिवसेनेच्या या वाघिणीने केलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. निशा घोंगडे या शिवसैनिक दिवस किंवा रात्र न बघता गरजूंच्या मदतीला कसे धावून जातात, याचे मूर्तिमंत उदाहरण ठरल्या आहेत अशी चर्चा परिसरात ऐकायला मिळत आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button