औरंगाबादमधील सभेत पोलिसांनी घालून दिलेल्या गर्दीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल
![A charge sheet has been filed against MNS chief Raj Thackeray for violating the crowd rules laid down by the police in a meeting in Aurangabad](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/A-charge-sheet-has-been-filed-against-MNS-chief-Raj-Thackeray-for-violating-the-crowd-rules-laid-down-by-the-police-in-a-meeting-in-Aurangabad.jpg)
मुंबई: औरंगाबादमधील सभेत पोलिसांनी घालून दिलेल्या गर्दीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. औरंगाबादच्या जिल्हा न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर पोलिसांनी यासंदर्भात राज ठाकरे यांना नोटीसही पाठवली आहे. त्यामुळे आता राज ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
या सभेत राज ठाकरे यांनी चिथावणीखोर भाषण केल्याचा आरोप होता. पोलिसांनी मनसेच्या सभेसाठी आवाजाची आणि गर्दीची मर्यादा घालून दिली होती. परंतु, राज ठाकरे यांनी हे सर्व निर्बंध झुगारून दिले होते. त्यामुळे सायबर पोलिसांनी राज ठाकरे यांच्या भाषणाचे फुटेज तपासून तो अहवाल गृहमंत्रालयाकडे पाठवला होता. गृहमंत्रालयात चर्चा झाल्यानंतर राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश देण्यात आला. त्यानुसार, औरंगाबाद सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता पोलिसांनी न्यायालयात राज ठाकरे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.
राज ठाकरे म्हणाले, सोशल मीडियावर पक्षाविरोधात कमेंट कराल तर एका क्षणात पक्षातून हाकलून देईन…
आता भारत नाही तर ‘हिंदूंचा हिंदुस्थान’
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. राज्य ठाकरे यांचा हस्ते आज मनसेच्या सदस्य नोंदणी मोहीमेला प्रारंभ झाला. मनसे कार्यकर्त्यांनी हिंदूंचा हिंदुस्थान असा उल्लेख करणारा पोस्टर झळकावला आहे. आज पुण्यात राज ठाकरेच्या पोस्टरवर आता भारत नाही तर हिंदूंचा हिंदुस्थान,हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी हिंदू जननायक, असे पोस्टर सगळ्यांचा चर्चेचा विषय ठरत आहे. आगामी महापालिका निवडणुकांसाठी मनसेची पक्ष बांधणी सुरू झाली आहे. राज ठाकरे यांची जाहीर सभा नुकतीच मुंबईत पार पडली होती.