पुणे शहर, जिल्ह्यातील २७ शाळा बोगस; या शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे जिल्हा परिषदेचे आवाहन
![27 bogus schools in Pune city, district; Zilla Parishad's appeal not to take admission in these schools](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/पुणे-शहर-जिल्ह्यातील-२७-शाळा-बोगस-या-शाळांमध्ये-प्रवेश-न.jpg)
पुणे : यंदाच्या २०२२-२३ एक नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. या दृष्टीने पालकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. तुम्ही जर आपल्या स्वतःच्या पाल्याला शाळेत घालणार असाल तर आपल्या पाल्याने प्रवेश घेतलेली शाळा बोगस तर नाही ना हे पाहणे महत्वाचे झाले आहे. याचे कारण म्हणजे याबाबत जिल्हा परिषद प्रशासनाने पुणे शहर आणि जिल्ह्यातील जवळपास २७ बोगस शाळांची यादी जाहीर केली आहे. (27 schools in Pune city and district are bogus)
जिल्ह्यात २७ बोगस शाळा
काही दिवसांपूर्वी राज्यातील तब्बल ६७४ शाळा अनधिकृत असल्याचं समोर आले होते. विशेष म्हणजे यातील सर्वाधिक २२३ शाळा मुंबईमधल्या होत्या. तसेच याबाबत शिक्षणाधिकारी पंचायत समिती यांच्या अहवालानुसार जिल्ह्यात २७ शाळा या अनधिकृतरित्या शासनाच्या मान्यता प्राप्त प्रमाणपत्राशिवाय चालवल्या जात आहेत. अशा बोगस २७ शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
पालकांना आवाहन
पुणे शहर आणि जिल्ह्यात २७ शाळा अशा आहेत की, ज्यांना मान्यताप्राप्त झालेल्या नाही. या २७ शाळांचा स्व मान्यतेचा प्रस्ताव हा नाकारण्यात आलेला आहे. तसेच त्यांना दिलेले निकष या शाळा पूर्ण करत नाही. याबाबत जिल्हा परिषदेचे विशेष कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी आवाहन केले आहे की, माझी सर्व पालकांनी त्यांनी २७ शाळांमध्ये आपल्या मुलाचा प्रवेश करू नये तसेच जर कोणी प्रवेश केला असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क करावं आम्ही त्याची मदत करू. अस आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केलं आहे.
लवकरच शासनाच्या नियमानुसार कारवाई
जिल्ह्यात ज्या २७ शाळा अनधिकृतरित्या शासन मान्यता प्रमाणपत्राशिवाय चालवल्या जात आहेत. त्यांच्यावर शासनाच्या नियमानुसार लवकरच कारवाई केली जाणार असल्याचे प्रसाद यांनी सांगितले आहे.
या २७ शाळा आहेत बोगस-
> सुलोचनाताई झेंडे बालविकास मंदिर व प्राथमिक विद्यालय, कुंजीरवाडी तालुका हवेली
> बी.बी.एस. इंटरनॅशनल स्कूल वाघोली तालुका हवेली
> रिव्हर स्टोन इंग्लिश मिडीयम स्कूल, पेरणेफाटा, पेरणे तालुका हवेली
> व्ही.टी.एल.ई.लर्निंग स्कूल, भेकराईनगर शेवाळेवाडी तालुका हवेली
> किडस् वर्ड इंग्लिश मिडीअम स्कूल, पापडेवस्ती, फुरसुंगी शेवाळेवाडी तालुका हवेली
> संस्कृती पब्लिक स्कूल (माध्यमिक) उत्तमनगर,शिवणे तालुका हवेली
> न्यूटन इंग्लिश मिडीयम स्कूल, मांगडेवाडी तालुका हवेली
> शिवसमर्थ इंग्लिश मिडीयम स्कूल, मांगडेवाडी तालुका हवेली
> ऑरचिड इंटरनॅशनल स्कूल, आंबेगांव बु,मांगडेवाडी तालुका हवेली
> संस्कृती नॅशनल सकूल, लिपानेवस्ती, जांभूळवाडी रोडमांगडेवाडी तालुका हवेली
> संत सावतामाळी प्राथमिक विद्यालय, माळीमळा, लोणीकाळभोर तालुका हवेली
> पुणे इंटरनॅशनल पब्लिक स्कूल, अष्टापुरेमळा, लोणीकाळभोर तालुका हवेली
> द. टायग्रेश स्कूल, कदमवाकवस्ती,लोणीकाळभोर तालुका हवेली
> ई. मॅन्युअल इंग्लिश स्कूल, खांदवेनगर लोहगाव तालुका हवेली
> लिटिल हार्ट इंग्लिश मिडीयम स्कूल काळेवस्ती सणसर तालुका इंदापूर
> महात्मा फुले विद्यालय निमगावकेतकी तालुका इंदापूर
> गौतमेश्वर प्राथमिक विद्यालय दत्तनगर शेळगांव तालुका इंदापूर
> शंभू महादेव विद्यालय दगडवाडी तालुका इंदापूर
> ईरा पब्लिक स्कूल इंदापूर
> विठ्ठलराव शिंदे विद्यालय इंदापूर
> जयहिंद पब्लिक स्कूल भोसे, ता. खेड, जि. पुणे
> सहयाद्री माध्यमिक विद्यालय मेटलवाडी मु. मेटलवाडी, पो.खांडी, ता.मावळ, जि. पुणे
> डिवाईन विसडम प्रायमरी स्कूल वाकसाई ता. मावळ, जि. पुणे
> सरस्वती प्रि प्रायमरी वैद्य मंदिर / अल्फा एज्युकेशन हाय स्कुल पिरंगुट तालुका मुळशी
> नविन प्राथमिक शाळा जेजुरी, ता. पुरंदर
> शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल राख, ता. पुरंदर
> आकांशा स्पेशल चाईल्ड स्कूल रामलिंग रोड, शिक्षक कॉलनी शिरुर ग्रामीण.