breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

३१ डिसेंबरपर्यंत तो फलक हटवला नाहीतर…; तृप्ती देसाईंचा इशारा

३१ डिसेंबरपर्यंत फलक हटवला नाहीतर, आम्ही पुन्हा शिर्डीत येऊन आंदोलन करू, असा तीव्र इशारा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी शिर्डी संस्थानास दिला आहे. तसेच, त्यावेळी आम्ही शिर्डी संस्थानास तालिबानी पुरस्कार देऊन सत्कार करू व त्यांच्या निर्णयाचा निषेध करू असही त्या म्हणाल्या.

शिर्डी येथील साई संस्थानने महिलांच्या ड्रेसकोडाबाबत लावलेला आक्षेपार्ह फलक हटवण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई आज सकाळी पुण्याहून शिर्डीकडे निघाल्या होत्या. नगरच्या सीमेवर सुपे टोलनाक्याजवळ पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं.

यानंतर दुपारी त्यांची सुटका करण्यात आली. यावेळी तृप्ती देसाई म्हणाल्या की, ”तुमच्या जीविताला धोका असल्याने शिर्डीला तुम्हाला जाता येणार नाही, असे सांगून आम्हाला आता सोडण्यात आलेलं आहे. परंतु अटक केल्यानंतर आम्हाला असं कळालं की, तिकडं जल्लोष करण्यात आला. जिथं साईबाबांनी सबका मालिक एक आहे असं सांगितलं. तिथं महिलांना अटक झाल्यावर जर कुणी जल्लोष करत असेल, तर मला असं वाटतं की महिलांचा अपमान करणारी मानसिकता अजूनही शिर्डीत आहे किंवा विरोध करणाऱ्यांमध्ये आहे. हीच मानसिकता बदलण्यासाठी आमचं आंदोलन आहे.”

अवश्य वाचाः #VIRALVIDEO: जिंदगी ना मिलेगी दुबारा; वयस्कर आजीआजोबांचा डान्स व्हिडिओ व्हायरल

तसेच, ”या फलकाच्या माध्यमातून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न संस्थानाकडून केला गेलेला आहे. तो पूर्णपणे चुकीचा आहे. आम्हाला असंही कळालं की तो बोर्ड आमच्या हाताला लागू नये म्हणून उंचावर घेण्यात आला आहे. परंतु उंचावर घेण्यापेक्षा जर तो काढून टाकला असता तर निश्चितच संस्थानाचं आम्ही अभिनंदन केलं असतं. परंतु आता जरी पोलिसांनी आम्हाला सांगितलेलं असेल, की शिर्डीला तुम्ही गेलात तर तुमच्या जीवितास धोका आहे. त्यामुळे तुम्हाला पुण्यालाच जावं लागेल. त्यामुळे आम्हाला आता पुण्याला जावं लागत आहे. मात्र पुन्हा एकदा मी साई संस्थानला विनंती करते की, ३१ डिसेंबरपर्यंत जर फलक हटवला नाहीतर आम्हाला पुन्हा तिथं यावं लागेल व फलक हटवावा लागेल. त्यामुळे साई संस्थानाची भूमिका पूर्णपणे अयोग्य आहे. आम्ही जेव्हा ३१ डिसेंबरनंतर आंदोलन करू, तेव्हा संस्थानाने जर फलक काढला नाहीतर, आम्ही संस्थनाचा तालिबानी पुरस्कर देऊन सत्कार करणार आहोत व निषेध करणार आहोत.” या शब्दांत तृप्ती देसाई यांनी साई संस्थानाला अखेरचा इशारा दिला.

काय आहे ड्रेसकोड फलक

शिर्डीमधील साई मंदिर दर्शनासाठी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी शिर्डी साई संस्थानकडून ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. मंदिरात येताना भक्तांनी सभ्य पोषाख परिधान करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. भक्त छोटे कपडे घालून मंदिरात येत असल्याची तक्रार आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं संस्थानाकडून सांगण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button