breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘स्मार्ट’ प्रकल्प निवडीत आयुक्तांचे सत्ताधारी-विरोधकांचा समेट घडवण्याचा प्रयत्न

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गंत सगळे प्रकल्प फक्त पिंपळे गुरव आणि पिंपेळ सौदागर भागात राबविण्यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोपाच्या फैरी होत आहेत. त्यात स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या शनिवारी (दि.8) झालेल्या बैठकीत सहा पैकी पाच शाळा याच भागातून निवडण्यात आल्या. तर, चिखलीतील म्हेत्रे वस्तीतील एक शाळा ही विरोधी पक्षनेत्यांच्या वॉर्डातील निवडण्यात आली. मात्र, पालिका शाळांचा दर्जा सुधारण्याऐवजी अशा पध्दतीने ठराविक शाळा निवडल्याने काही संचालकांनी त्याला विरोध केला.
पिंपरी चिंचवड महापालिकेत आज (शनिवारी) स्मार्ट सिटी प्रकल्पाची बैठक पार पडली. यावेळी अध्यक्ष नितीन करीर, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी सभापती ममता गायकवाड, विरोधी पक्षनेते दत्ता साने, संचालक प्रमोद कुटे, सचिन चिखले आदी अधिकारी उपस्थित होते.
स्मार्ट सिटीमधून सहा शाळा स्मार्ट करण्याचा संकल्प स्मार्ट सिटी कंपनीने केला आहे. त्या अंतर्गंत अत्याधुनिक सोयी व सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. स्मार्ट शाळा या प्रकल्पासाठी स्मार्ट सिटी कंपनीच्या अंदाजपत्रकात यापूर्वी 4 कोटींची तरतूद करण्यात आली होती. ती वाढवून 40 कोटी रुपये इतकी करण्यात आली आहे.
दरम्यान , चिखलीतील शाळा विरोधी पक्षनेते दत्ता साने व सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या प्रभागातील आहे. त्या एका शाळेचा समावेश करून या दोन्ही पदाधिका-यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, इतर पाचही शाळा सांगवी, पिंपळेगुरव व पिंपळे सौदागरमधील आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटीसाठी या भागाची निवड करण्यावरून बरेच आरोप-प्रत्यारोप सातत्याने सुरू आहे. त्यात आणखी शाळा निवडतानाही शहरातील इतर भागांचा विचार स्मार्ट सिटी कंपनीने केलेला नाही.  त्याबाबत विचारले असता आयुक्त श्रावण हर्डकीर प्रायोगिक तत्वावर निवड केल्याचे म्हटले. तर, विरोधी संचालकांनी स्मार्ट सिटीतून ठराविक शाळा स्मार्ट करून उपयोग नाही. पालिकेच्या सर्व शाळांचा दर्जा सुधारावा, अशी मागणी बैठकीत केली.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button