साडेचार लाखाचे गायीचे भेसळ युक्त तूप जप्त; भारती विद्यापीठ पोलिसांची मोठी कारवाई
![साडेचार लाखाचे गायीचे भेसळ युक्त तूप जप्त भारती विद्यापीठ पोलिसांची मोठी कारवाई](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/साडेचार-लाखाचे-गायीचे-भेसळ-युक्त-तूप-जप्त-भारती-विद्यापीठ-पोलिसांची-मोठी-कारवाई.jpg)
आंबेगाव भागातील अभिनव कॉलेज समोरून सुमारे १०० डब्बे तूप घेऊन जाणारा टेम्पो पेट्रोलिंग करीत असताना पोलीसांना संशयास्पद आढळला. त्याची चौकशी केली असता हे भेसळ युक्त गायीचे तूप असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन भागातून भेसळ युक्त तूप जात असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. काही गाड्याची चेकीग केल्यानंतर एक मेगा एक्सल कंपनीचा टेम्पो क्रमांक एम एच १२ आर एन २४५० टेम्पो आम्ही थांबवला यामध्ये कुटलाही मार्क, कंपनीचे नाव नसलेले सुमारे १०० डब्बे तूप आढळले.
गाडी चालक शिवराज हळमणी (रा.हत्तीकनबस,ता.अक्कलकोट,जी.सोलापूर) याने हा माल डीजीएम (देवक फुड्स कंपनी ) शिवणे येथील कंपनीतून घेतला असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने अन्न औषध प्रशासनाला याची माहिती कळवली. या विभागातील क्रांती बारवकर यांनी पाहणी करून हे भेसळ युक्त गायीचे तूप असल्याची खात्री केली. या कारवाई मध्ये सुमारे १४९९ किलो गायीचे तूप किमत अंदाजे साडेचार लाख रुपये पोलिसांनी जप्त केले आहे.