संभाजी ब्रिगेड ग्रामपंचायत निवडणुकीच्या मैदानात
![Home Minister Anil Deshmukh will protest by showing black flags.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/Sambhaji-Brigade-is-in-Grampanchayat-elections.jpg)
14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. 15 जानेवारीला मतदान होणार आहे, तर 18 जानेवारीला मतमोजणी करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आणि महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. यातच आता संभाजी ब्रिगेड संघटनेने देखील ग्रामपंचायतीची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे.
विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीदर मदतारसंघाच्या निवडणुकीत संभागी ब्रिगेडच्या उमेदवारांना चांगली मते मिळाली होती. याच पार्श्वभूमीवर आता संघटनेने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी याबाबत माहिती दिली की, संघटना राज्यातील सर्वच ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये उमेदवार उतरवणार आहे.
या निवडणुकीत संघटनेचे किती उमेदवार निवडून येतात व कोणाची मते खातात ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.