शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक; व्हेरिफिकेशनचा मेसेज पाठवून केलं हॅक
![Shivsena leader Urimila Matondkar instagram hack](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/Shivsena-leader-Urimila-Matondkar-instagram-hack.jpg)
अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी त्यांचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याचे ट्विट करत माहिती दिली. यासंदर्भात सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली असून, ते अधिक तपास करत आहेत.
हॅकरने आधी त्यांना व्हेरिफिकेशनसाठी डायरेक्ट मेसेज पाठवला आणि त्यानंतर उर्मिला यांचे अकाऊंट हॅक केले. याप्रकरणी ऊर्मिला यांनी आता मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार दाखल केली. मातोंडकर यांनी सायबर सेलच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांचीही भेट घेतली.
मातोंडकर यांनी ट्विट करत म्हणाल्या की, ‘माझं इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झालं आहे. त्यांनी आधी मला इनबॉक्समध्ये मेसेज केला आणि अकाउंट संबंधी काही स्टेप्सना फॉलो करायला सांगितलं. अकाउंट वेरिफाय झालं आणि लगेच ते हॅक झालं.. खरंच?
पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांची भेट घेताच त्यांच्याकडून या गुन्ह्यासंबंधी बरीच माहिती मिळाल्याचे सांगत, भविष्यात यावर काम करणार असल्याचेही त्या म्हणाल्या.