breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वायसीएमचे डाॅ. विनायक पाटील यांच्यावर सेवानिलंबनाची कारवाई

आयुक्तांची कारवाई, खातेनिहाय चाैकशीचेही आदेश 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवरील वायसीएमचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. विनायक पाटील यांच्यावर निगडी पोलिस ठाण्यात फाैजदारी गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे पाटील यांच्यावर सेवानिलंबनाची कारवाई करुन खातेनिहाय चाैकशीचे आदेश आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी दिले. 

निगडी पोलिस ठाण्यात एका महिलेने महापालिकेच्या ‘वायसीएम’ रूग्णालयातील डाॅ. विनायक पाटील यांनी दूरध्वनी करून शरीरसुखाची मागणी केलीय, तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी तक्रार देवून  डॉक्टरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.

याबाबत वैद्यकीय अधिका-याने पदावर कार्यरत असताना गैरवर्तन केल्याने त्यांच्यावर फाैजदारी कारवाई झाली. त्यांना 19 नोव्हेंबर 2018 रोजी अटकेची कारवाई होवून 48 तासापेक्षा जास्त अटक केल्याचा अहवाल विशेष कार्य अधिकारी तथा अधिष्ठाता वायसीएम रुग्णालयांनी 21 डिसेंबर 2018 रोजी सादर केला होता. त्यामुळे डाॅ. विनायक पाटील यांनी शासकीय कर्मचा-याला अशोभनीय असे गुन्हेगारीचे गैरवर्तन करुन जनमाणसात महापालिकेची प्रतिमा मलिन केलेली आहे. याप्रकरणी डाॅ. पाटील यांच्या अटकेच्या दिनाकापासून सेवानिलंबित करण्यात येत असून महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1978 च्या नियम 8 नूसार खातेनिहाय चाैकशी सुरु करण्याचे आदेश आयुक्त हर्डिकर यांनी दिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button