राहूल गांधीकडून भरसभेत ‘मसूद अजहरजी’ उल्लेख, नेटक-यांकडून केले ट्रोल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/राहूल-गांधी.jpg)
मुंबई – पुलवामा हल्ल्यावरून भाजपाला लक्ष्य करण्याच्या नादात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी स्वत:च अडचणीत सापडले आहेत. भर सभेत राहुल यांनी पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार आणि ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या याचा ‘मसूद अजहरजी’ असा आदरार्थी उल्लेख केला. यावरून भाजपाने राहुल यांना ट्रोल केले असून ‘RahulLovesTerrorists’ असा हॅशटॅग वापरला आहे.
सोमवारी नवी दिल्ली येथे काँग्रेस बुथ कार्यकर्त्यांसमोर राहुल भाषण करत होते. ‘पूर्वीच्या भाजपा सरकारनेच मसूद अजहरला सोडलं होतं’ असे वक्तव्य करताना राहुल यांनी अजहरजी असा आदरार्थी उल्लेख केला.
राहुल यांच्या या वक्तव्यामुळे भाजपाच्या आयटी सेलने त्यांना ट्रोल केले आहे. भाजपच्या अधिकृत फेसबुक पेजवर राहुल यांचा हा व्हीडिओ टाकण्यात आला असून ‘RahulLovesTerrorists’ असा हॅशटॅग वापरत ‘‘देशातील ४४ शहीद जवानांच्या मृत्यूसाठी जबाबदार असणारे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या सूत्रधारासाठी राहुल यांचा इतका आदर!’’ असा टीकात्मक संदेश लिहीला आहे.
https://twitter.com/BJP4India/status/1105092724213059585