रतन टाटांच्या माणुसकीचे दर्शन, आजारी माजी कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी थेट पुण्यात
![Ratan Tata meets his exemployee in Pune Kothrud](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/Ratan-Tata-meets-his-exemployee-in-Pune-Kothrud.jpg)
प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा त्यांच्या कर्मचार्यांची खूप काळजी घेतात. याची अनेक उदाहरणे यापूर्वीदेखील पाहायला मिळाली आहेत. आताही त्यांच्या याच समाजसेवेचा अजून एक क्षण पुण्यात दिसून आला. मागील दोन वर्षांपासून आजारी असलेल्या एका माजी कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी रतन टाटा हे थेट मुंबईहुन पुण्यात त्यांच्या घरी पोहोचले. यावेळी टाटा यांनी संपूर्ण कुटुंबाचा खर्च आणि मुलांच्या शिक्षणाची काळजी घेण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यांच्या या क्षणाचा एक फोटो सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.
ते कर्मचारी गेल्या दोन वर्षांपासून आजारी होते. विषेश म्हणजे आजारी कर्मचारी आता रतन टाटा यांच्यासाठी काम करत नाही. असं असुनही रतन टाटा यांनी त्यांच्या कर्मचाऱ्याची आठवण ठेवली. कर्मचाऱ्याच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी त्याच सोसायटीत रहाणाऱ्या एका व्यक्तिने फोटो काढून ट्विटरवर शेअर केला आहे. टाटांच्या या कृतीचं सर्वच स्तरातून कौतूक करण्यात येत आहे.