रक्षा बुलियन यांच्याशी संबंधित चार ठिकाणी ‘ईडी’ची छापेमारी; ४३१ किलो सोने-चांदी जप्त
ED raids at four places related to Raksha Bullion; 431 kg of gold and silver seized
पारेख अॅल्युमिनेक्स लिमिटेडशी संबंधित मनी लाँड्रिंग झाल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर ईडीकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत होती. दरम्यान, संक्तवसुली संचालनालयाने मुंबईतील रक्षा बुलियन आणि क्लासिक मार्बल्स यांच्याशी संबंधित चार ठिकाणी छापेमारी केली. यावेळी एकूण ४३१ किलो सोनं-चांदी जप्त करण्यात आली.
ED concluded searches on 4 premises belonging to Raksha Bullion & Classic Marbles. The searches were conducted in connection with the money laundering probe in case of Parekh Aluminex ltd. Seizure of 91.5 kg gold and 340 kg silver, valued at Rs 47.76 Cr has been made: ED https://t.co/XjlRcvnIb3 pic.twitter.com/9wuwCYWIeP
— ANI (@ANI) September 14, 2022
या छापेमारी दरम्यान ईडीने बुनियन यांच्या खासगी लॉकर्सची झडती घेतली असता त्यातून ९१.५ किलो सोने, १५२ किलो चांदी जप्त करण्यात आली. तसेच रक्षा बुलियन यांच्याशी संबंधित जागेवरून १८८ किलो अतिरिक्त चांदीही जप्त करण्यात आली. या संपूर्ण कारवाईत ईडीने एकूण ४३१ किलो सोने-चांदी जप्त केली.