Uncategorized
‘या’ लघुपटात दिसेल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बालपण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/narendra-modi-1.jpg)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित लघुपटाची राष्ट्रपती भवन येथे नुकतीच स्र्क्रीनिंग झाली. दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लघुपट पाहिला. लघुपट निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘चलो जीते हैं’ हा लघुपट ३२ मिनिटांचा आहे. या चित्रपटात दाखवलेला मुलगा स्वामी विवेकानंद यांच्या ‘वही जीते हैं, जो दूसरों के लिए जीते हैं’ या वाक्यापासून प्रभावित होतो.
लघुपट दिग्दर्शक मंगेश हदवाले म्हणाले, ” मि नरेंद्र मोदी यांचा प्रचार करण्यासाठी चित्रपट बनविला नसून ही त्यांच्या सुरवातीच्या दिवसांवर आधारित आहे”. हदवाले यांना मराठी चित्रपट ‘तिंज्ञा’ (2008) साठी पुरस्कार मिळाला आहे.
महावीर जैन आणि भूषण कुमार यांनी ‘चलो जीते हैं’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. २९ जुलैला हा लघुपट प्रदर्शित होणार आहे.