मुख्यमंत्र्याच्या सभेत ‘एक मराठा लाख मराठा’ अशी घोषणा देणा-या महिलेला अटक
पिंपरी (महा ई न्यूज) – चिंचवड येथील क्रांतीवीर चापेकर राष्ट्रीय स्मारकांच्या दुस-या टप्प्यातील कामाचे भुमिपुजन आज (सोमवारी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरु असताना उपस्थितांमध्ये बसलेल्या एका महिलेने अचानक गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी पोलिसांनी तिला अडविले त्यावेळी तिने ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा दिल्या. अचानक झालेल्या गोंधळामुळे सर्वांचे लक्ष द्या महिलेकडे वेधले, पोलिसांनी तत्काळ त्या महिलेला ताब्यात घेतले. तसेच त्या महिलेला कार्यक्रम स्थळापासून बाहेर घेवून गेले.
दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत शासनाने मेगा भरती स्थगित करावी, मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावे, मराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील 50 टक्के सवलतीती अंमलबजावणी न करणा-या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा, राज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठ्यांसाठी घोषित केलेल्या 16 टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रुपांतरण करावे, अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेअंतर्गत कर्ज देण्यासाठी बॅंकाना सक्तीचे आदेश द्यावेत. अशा विविध मागण्या मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने करण्यात येत आहेत.