मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप, चरणसिंह सप्रा कार्यकारी अध्यक्ष
![Mumbai congress president Bhai Jagtap elected](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/Mumbai-congress-president-Bhai-Jagtap-elected.jpg)
नवी मुंबई : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुंबई काँग्रेसच्या काही महत्त्वाच्या पदासांठी उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. यात मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी विधान परिषदेचे आमदार भाई जगताप यांची निवड झाली आहे. तर चरणसिंह सप्रा यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
काँगेसचे महासचिव के सी वेणुगोपाल यांनी काढलेल्या पत्रकात जगताप हे मुंबईचे अध्यक्ष, तर चरणसिंग सप्रा हे कार्याध्यक्ष म्हणून जाहीर करण्यात आले आहे. समन्वय समितीचे अध्यक्ष म्हणून अमरजितसिंग आर मनहास यांना नियुक्त करण्यात आले आहे. अजेंडा आणि प्रसिद्धी समितीच्या अध्यक्षपदी सुरेश शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसकडून भाई जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाई जगताप सध्या काँग्रेसकडून विधान परिषदेवर आमदार आहेत.