Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

‘मी तुम्हाला प्रश्न विचारण्याएवढा मोठा झालो नाही’ – अमिताभ बच्चन

सोलापूरातील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रणजित डिसले यांना ग्लोबल टिचर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या कार्याचा गौरव कौन बनेगा करोडपती मध्ये अमिताभ बच्चन यांनीही केला. ‘मी अजून विद्यार्थी असून, तुमच्यासारख्या मोठ्या शिक्षकांना प्रश्न विचारण्याएवढा मोठा झालो नाही’, असे महानायक अमिताभ बच्चन हे ‘कौन बनेगा करोडपती’ शोमध्ये डिसले गुरुजींना म्हटले आहेत.

नुकतेच डिसले हे कोन बनेगा करोडपतीमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी १४ प्रश्नांच्या टप्प्यापर्यंत पोहोचून ५० लाख रुपये जिंकले. ही रक्कम ते महिलांचे न्यायदान आणि मुलांचे शिक्षणासाठी एका संस्थेला देणार आहेत. याबाबत डिसले म्हणाले, अमिताभसरांना भेटणे हे अविस्मरणीय क्षण आहे. एप्रिलमध्येच कार्यक्रमासाठी त्यांनी विचारणा केली होती, पण कोरोनामुळे मी नकार दिला होता, पण त्यानंतर जुलैमध्ये शुटिंगचे प्लॅन ठरले होते, पण तेव्हा अभिताभजींना कोरोना झाला. यामुळे नोव्हेंबर महिन्यामध्ये शोची शुटिंग झाली. तो शो नुकताच प्रसारित झाला.

वाचाः RagawaVideo: पुण्यात पुन्हा रानगवा; पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर दर्शन

त्या शोमध्ये माझ्यासोबत बोमन इराणी होते. आम्ही दोघांनी मिळून सात करोड जिंकून जाणार, असे ठरवले होते. त्यानुसार आम्ही जिंकत गेलो. १३ व्या आणि १४ व्या प्रश्नाला आमची दोन लाइफ लाइन खर्ची गेल्या. पुढचे प्रश्न घेण्याआगोदरच आमची वेळ संपल्यामुळे आम्हाला पन्नास लाख रुपयांवरच समाधान मानावे लागले. आम्ही जिंकलेली रक्कम शिक्षणासाठी खर्च होणार असल्यामुळे आम्हाला आनंद आहे.

…भरभरून कौतुक केले – डिसले गुरूजी

आम्ही शुटींगचा पुर्ण दिवस अभिताभ बच्चन यांच्या सोबत होतो़. शिक्षकांप्रति त्यांच्या मनामध्ये खूप आदर आहे. आम्ही सोबत जेवायला बसल्यानंतर आम्ही पहिला घास घेतल्यानंतरच त्यांंनी जेवायला सुरूवात केली. छोट्या-छोट्या गोष्टीतून त्यांच्या विचारांचा राजेशाहीपणा दिसून आला. सोबतच त्यांचे विचार कृतीत व्यक्त होत होते. त्यांनी माझ्या ‘क्यूआर’ कोड शिक्षण प्रणालीबद्दल भरभरून कौतुक केले अन्‌ म्हणाले, ‘काश, मै आपका स्टूडंट होता’ ..डिसले गुरूजी यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button