breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

माजी महापौर मंगला कदम यांचा पोरकटपणा शहर विकासाला बाधक – ममता गायकवाड

अंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीकडूनच लेझर शो होणार

मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून कोणाचाही फोन आलेला नाही

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संभाजीनगर येथील प्रस्तावित ‘लेझर शो’च्या निविदेसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून श्रीकांत भारती यांचा फोन आल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या माजी महापौर मंगला कदम यांनी केला. वास्तविक पाहता मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून ‘लेझर शो’च्या निविदेसंदर्भात असा कुठलाही फोन आलेला नाही. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीकडूनच ‘लेझर शो’ हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. त्यासाठी जर्मन बनावटीची यंत्रसामग्री उपयोगात आणून हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. हे मंगला कदम यांना कदाचित ज्ञात नसावे, यामुळेच त्यांनी बिनबुडाचे आरोप केले आहेत. केवळ प्रसिध्दी मिळविण्यासाठी माजी महापौर असलेल्या कदम यांचा हा पोरकटपणा पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाला बाधक ठरत आहे, असा आरोप स्थायी समितीच्या अध्यक्षा ममता गायकवाड यांनी केला आहे.

चिंचवडच्या संभाजीनगर येथे ‘लेझर शो’ प्रकल्प राबविण्याचे नियोजन 2015-16 या आर्थिक वर्षात करण्यात आले. त्यासाठी त्यावर्षीच्या अंदाजपत्रकात आवश्यक तरतूद केली. तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीच्या कार्यकाळात पक्षनेत्या राहिलेल्या मंगला कदम यांनी या लेझर शोच्या निविदेत हस्तक्षेप केला होता. त्यांचे लागेबांधे असलेल्या कंत्राटदाराला निविदेत सहभागी होण्यासाठी साजेशा अटी-शर्ती लागू केल्या होत्या. परंतु. त्यांच्या निष्क्रीय कार्यपध्दतीमुळे लेझर शोचे काम रेंगाळले. हा प्रकल्प दर्जेदार पध्दतीने साकारण्यासाठी आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी अनेक कंपन्यांचे सादरिकरण घेतले. त्यानुसार निविदेमध्ये आवश्यक ते बदल केले आहेत. टेक्निकल बाबींचा सखोल अभ्यास करूनच आयुक्तांनी या प्रकल्पाची निवीन निविदा तयार केली आहे. जुन्या आणि नवीन निविदेमध्ये नाममात्र बदल दिसून येत असला तरी लेझर शोचा दर्जा टिकून रहावा, यासाठी आयुक्तांनी तांत्रीक बाबींची पुर्तता केली आहे. त्यामुळे विलंब झाल्याने यात मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून श्रीकांत भारती यांचा हस्तक्षेप झाल्याचा आरोप कदम यांनी केला. हा धादांत खोटा आरोप आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून कुठलाही फोन आलेला नाही. केवळ स्वतःची प्रसिध्दी करण्यासाठी कदम यांनी माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत, असेही स्थायी समिती सभापती गायकवाड यांनी म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीकडूनच हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा आराखडा कोणाच्या सांगण्यानुसार बदललेला नाही. प्रकल्पाचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी नवीन निविदेमध्ये अत्याधुनिक तांत्रीक पध्दतीचा विचार करून बदल केलेला आहे. नवीन निविदेमुळे महापालिकेचे नुकसान होणार नाही. उलट पिंपरी-चिंचवडमधला हा प्रकल्प नाविन्यपूर्ण ठरणार आहे. नवीन निविदेमध्ये अॅटोमेटीक पंप, नोझल व इतर सर्व साहित्य हे जर्मन बनावटीचे वापरण्यात येणार आहेत. त्यामुळे मंगला कदम यांच्या आरोपात काही तथ्य नाही. निवडणुकीच्या पुर्वी त्यांच्या पक्षश्रेष्ठींची मर्जी सांभाळण्यासाठी त्यांनी केलेले हे बिनबुडाचे आरोप आहेत, असेही गायकवाड यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button