मराठा समाजाच्या मागणीला आमचा पाठिंबा – रामदास आठवले
![पाच राज्यांत भाजपाची सत्ता येणार- रामदास आठवले](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/Ramdas-Athavale-support-Maratha-Reservation.jpg)
मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी सर्वात आधी माझ्या पक्षाने केली, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री आणि आरपीआय नेते रामदास आठवलेंनी केले आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मागणी सर्वात आधी माझ्या पक्षाने केली असल्याचे म्हणत, मराठा समाजाची जी मागणी आहे तिला आमचा पाठिंबा असल्याचेही रामदास आठवलेंनी म्हटले आहे.
मराठा समाजाच्या मागणीला आमचा पाठिंबा असून, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, असे आठवले म्हणाले. यावेळी बोलताना आठवले यांनी, ‘अजितदादा पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत येणार आहेत. म्हणूनच देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईन, असं म्हणत असतात’, असे म्हणत चौफेर फटकेबाजी केली.
मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाता निकाल येण्यास विलंब होऊ शकतो, त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून राज्य सरकारने मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे.