breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मराठा आरक्षण; स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न करणार – शरद पवार
![sharad pawar will try for maratha reservation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/sharad-pawar-2.jpg)
मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. यासंदर्भातील सुनावणी पुढील महिन्यात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.
सातऱ्यात मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी शरद पवारांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयातील स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी मी गेले अनेक वर्षे प्रयत्न करीत आहे. परंतु, त्यात वारंवार अडचणी येत आहेत. आता सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिलेली आहे आणि ती स्थगिती उठविण्यासाठी आपण पुढाकार घेऊ, असे आश्वासन शरद पवारांनी दिले.