Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मंत्री असलो तरी गाईचं दुध काढतो, गाडी हाकतो,बैलही धुतो – रावसाहेब दानवे
![Raosaheb Danave on farmers protest says I am also a Farmer](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/Raosaheb-Danave-on-farmers-protest.jpg)
शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचे वक्तव्य केल्याने वादात अडकलेले केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी आता स्वतःचा बचाव केला आहे. आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्याची विटंबना मीच काय कोणीच करू शकत नाही. पण एखाद्या बोलण्याचा विपर्यास बातमीमुळे होत असेल तर माझा नाईलाज असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे. ते औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
रावसाहेब दानवे म्हणाले की, केंद्रातला मंत्री असलो तरी गाईचं दुध काढतो, गाडी हाकतो आणि बैलही धुतो याचा अर्थ मी बनावट शेतकरी नाही तर हाडाचा शेतकरी आहे. शेतीच्या क्षेत्रात ज्या माणासाने जन्म घेतला तो शेतकरी विरोधी वक्तव्य करू शकत नाही, असे दानवे म्हणाले.